आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP नेत्याची भर रस्त्यावर अधिकाऱ्याला मारहाण, हा नजारा पाहून भडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप नेते धावतच आले आणि अधिकाऱ्यावर भिडले. - Divya Marathi
भाजप नेते धावतच आले आणि अधिकाऱ्यावर भिडले.

लातेहार (झारखंड) - येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी भाजप पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्यात फ्रि स्टाइल पाहायला मिळाली.  भाजप पदाधिकाऱ्याच्या स्कॉर्पिओवर लावण्यात आलेली नेम प्लेट काढण्याचे आदेश देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्याला (डीटीओ) नेताजींनी रस्त्यात पकडून देदणादण सुरु केले. त्यावेळी डीटीओंनी देखील त्यांच्या श्रीमुखात भडकवली. 

 

- झाले असे, की कोणत्याही सरकारी किंवा खासगी वाहनावर लोकप्रतिनिधीला नेमप्लेट लावता येत नाही आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजधानी प्रसाद यादव यांनी त्यांच्या स्कॉर्पिओवर स्वतःचे नाव आणि पदाची नेमप्लेट लावलेली होती. 
- डीटीओ फिलब्यूश बारला  जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांच्या नेमप्लेट असलेली गाडी त्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी तत्काळ नेमप्लेट काढण्याचे काम सुरु केले. 
- आपल्या गाडीवरील नेमप्लेट काढली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रागाने लालबूंद झालेल भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजधानी प्रसाद धावतच बाहेर आले.  त्यांनी काही एक न विचारता डीटीओची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करतच ते डीटीओवर ओरडले, की आधी नोटीस दिली पाहिजे होती ना? 
- डीटीओ बारला देखील आपल्या बचावात हात-पाय हलवायला लागले आणि त्यांनीही राजधानी प्रसाद यांना धक्काबुक्की केली. 
- डीटीओ म्हणाले, वृत्तपत्रांसह सर्व माध्यमांतून गाडीवर लावण्यात आलेल्या नेमप्लेट हटवण्याचे आवाहन सातत्याने होत आहे. 
- राजधानी प्रसाद म्हणाले, वृत्तपताने जग चालत नसते, नेम प्लेट काढायची तर आधी नोटीस दिली पाहिजे. 
त्यावर डीटीओ म्हणाले, शहरात एवढ्या गाड्या आहेत, प्रत्येकाला नोटीस देणे शक्य नाही. 
- यावेळी जिल्हाधिकारी परिसरातील वातावरण गरम झाले होते. या घटनेनंतर डीटीओ बारला यांनी राजधानी प्रसाद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी भाजप उपाध्यक्षांना अटक केली.

 

शेवटच्या स्लाइडमध्ये पाहा, भाजप नेते आणि अधिकारी यांच्यातील फ्रि स्टाइल...

बातम्या आणखी आहेत...