आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भोपाळ - टीटी नगर पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून माधव महाविद्यालयाचे संचालक (चेअरपर्सन) राजेश पराशर यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार करणारी महिला याच कॉलेजमध्ये प्रशासकीय अधिकारी होती. तिने आरोप केला आहे की, संचालकाने 6 वर्षांपूर्वी तिच्याबरोबर ऑफिसमध्ये गैरकृत्य केले होते. नंतर तो अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सलग तिचे शोषण करत राहिला.
दुसरीकडे राजेश यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, महिलेने महिलेने घर घेण्याची इच्छा व्यक्त करत तिच्या खात्यामध्ये राजेशकडून वेगवेगळ्या तारखांना 8 लाख रुपये अधिक जमा करून घेतले होते. तिने 40 लाखांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास विनयभंगाची तक्रार देण्याची धमकीही दिली होती.
शारीरिक संबंधांसाठी आणत होता दबाव
टीटी नगर पोलिसांच्या मते, करोंदमध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय महिला राजेश यांच्या कॉलेजमध्ये काम करत होत्या. त्या कॉलेजच्या टीटी ऑफिसमध्ये कामाला होत्या. महिलेने सांगितले की, राजेश त्यांच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव आणत होते. पण जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. नंतर सर्व काही विसरून जाण्याच्या अटीवर त्यांना पुन्हा नोकरीवरू रुजू करून घेण्यात आले. महिलेने आरोप केला आहे की, सहा वर्षांपूर्वी 25 ऑगस्ट 2012 रोजी सायंकाळी ऑफिसमध्ये काम करत असताना, राजेशने त्यांना केबीनमध्ये बोलावत त्यांच्याबरोबर गैरकृत्य केले होते.
पुढे वाचा, याप्रकरणाविषयी आखणी काही माहिती..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.