आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Case Registered Against Actress Raveena Tandon By Administration Of Lingaraja Temple In Bhubaneswar

भुवनेश्वरमध्ये रवीना टंडनविरोधात FIR दाखल, लिंगराज मंदिरात शूटिंग केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिर व्यवस्थापनाचा आरोप आहे की रवीनाने नो कॅमेरा झोनमध्ये शुटिंग केले आहे. त्यासाठी प्रशासनाची पुर्वपरवानगी घेतली नव्हती. - Divya Marathi
मंदिर व्यवस्थापनाचा आरोप आहे की रवीनाने नो कॅमेरा झोनमध्ये शुटिंग केले आहे. त्यासाठी प्रशासनाची पुर्वपरवानगी घेतली नव्हती.

भुवनेश्वर - अॅक्ट्रेस रवीना टंडनविरोधात बुधवारी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. लिंगराज मंदिर प्रशासनाने रवीनाविरोधात तक्रार केली आहे. रवीनाने नो कॅमेरा झोन असलेल्या मंदिराच्या भागात एक जाहिरातीचे शुटिंग केले असल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

 

रवीना काय म्हणाली? 
- रवीनाने आरोप फेटाळला आहे. ती म्हणाली, मी कोणतीही अॅड शुटिंग करत नव्हते. तिथे सर्व स्थानिक लोक आणि मंदिराचे विश्वस्त आणि सदस्य तसेच काही मीडियाचे लोक मोबाइलमध्ये व्हीडीओ शूट करत होते. सेल्फी देखील घेत होते. त्यांना फोन बॅनची माहिती नव्हती. मलाही त्याबद्दलची माहिती नव्हती. मला हे तेथील एका अधिकाऱ्याकडूनच कळाले. 

 

मंदिरात सुर होते अॅडचे शुटिंग 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरामध्ये रवीना टंडन एक अॅड फिल्म शूट करण्यासाठी आली होती. त्याठिकाणी नो कॅमेरा झोनमध्ये शुटिंग करण्यात आले. 
- लिंगराज मंदिराच्या व्यवस्थापकांनी या प्रकरणी रवीनाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
- मंदिर प्रशासनाने आरोप केला आहे की, रवीनाने नो कॅमेरा झोनमध्ये शुटिंग केली आहे. त्यासाठी तिने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. रवीना एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीच्या शुटिंगसाठी येथे आली होती. 
- प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत, तपास सुरू केला आहे. 

 

'मातृ' आणि 'शब' मध्ये झळकली रवीना 
- 90 च्या दशकातील प्रसिद्ध अॅक्ट्रेस असलेली रवीना नुकतीच 'मातृ' आणि 'शब' चित्रपटांत झळकली होती. 'मातृ' एका आईने घेतलेल्या बदल्याची कथा आहे. रवीनाने ही भूमिका साकारली होती. 
- तर 'शब'मध्ये रवीनाने बोल्ड रोल केला होता. त्यात तिने तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेला अॅक्टर आशिष बिष्टबरोबर स्क्रीन शेअर केले होते. 

बातम्या आणखी आहेत...