आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्राफिक पोलिसाने वीज कर्मचाऱ्याला पावती दिली, त्याने कापले कंट्रोल रूमचे अवैध वीज कनेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीरकपूर (पंजाब) - जीरकपूरच्या पटियाला चौकात मंगळवारी एका ट्राफिक हवालदाराने पॉवरकॉम वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला वाहतूक नियम तोडल्याप्रकरणी पावती दिली. त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. त्यावर वीज कर्मचाऱ्याने काही तासांत ट्राफिक कंट्रोल रूमचे वीज कनेक्शन कापले. वीज कर्मचाऱ्याचे असे म्हणणे होते की, कंट्रोल रूममध्ये वीजेच्या खांबावरून विना परवानगी कनेक्शन घेण्यात आले होते. 


वीज कर्मचारी जितेंदर सिंह यांचे म्हणणे होते की, त्यांना वीजेच्या तक्रारी सोडवण्यासाठी वारंवार संबंधित ठिकाणी जावे लागत असते. त्यामुळे त्याला हेल्मेट परिधान करणे शक्य होत नाही. त्याने दावा केला की, हवालदार सोहनलालने त्याच्याबरोबर गैरवर्तन केले आणि म्हटले, मला पावती द्यायचे पॉवर मिळाले आहे मी त्याचा वापर केला आहे. आता तुला जे करायचे ते कर.


वीज कंपनी दंड आकारणार 
जितेंदरने अशा प्रकारे पावती मिळाल्याचे त्याच्या वरिष्ठांना सांगितले. त्याचबरोबर संबंधित पोलिस कंट्रोल रूममध्ये एक वर्षभरापासून अवैध वीज कनेक्शन सुरू असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर वीज कंपनीचे एसडीओ रोहित कुमार पथकासह त्याठिकाणी गेले आणि त्यांनी अवैध कनेक्शन कापले. तसेच वीजचोरीचे प्रकरणही नोंदवले. आता वीज कंपनीने दंड ठोठावण्याची तयारी केली आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...