आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंचकुला - 7 मे 2012 रोजी अपना घरमधून पळून दिल्लीला पोहोचलेल्या 3 मुलींच्या तक्रारीवर अपना घरवर 9 मे 2012 रोजी छापा टाकून 103 मुली आणि युवतींची सुटका करण्यात आली होती. तेव्हा देशभरातून अपना घरमधील अत्याचाराविरोधात चीड आणि रोष निर्माण झाला होता. येथील मुलींना शहरातीलच नाही तर राज्यातील बड्या लोकांकडे पाठवले जात होता. त्याचे अश्लिल व्हिडिओ तयार केले जात होते. त्यांच्याकडून वेठबिगारीची काम करुन घेतली जात होती. एवढेच नाही तर डान्स पार्टीमध्ये त्यांना पाठवले जात असल्याचा आरोप होता. जर कोणी याला विरोध केला तर अनाथाश्रमाची संचालिका जसवंती त्यांच्यावर एवढा अत्याचार करत होती की त्या मुलीने नंतर कधीच नाही म्हणू नये. यात तिला साथ देत होती तिची मुलगी, जावई आणि ड्रायव्हर. या मुलांना 6 वर्षानंतर न्याय मिळाला आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाने नुकतेच जसवंती देवी, तिचा जावई जय भगवान आणि ड्रायव्हर सतीशला जन्मठेपेची शिक्षा सुनावील आहे. संचालिकेचा भाऊ जसवंतला 7 वर्षे तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2012 मध्ये देशभर झाली होती चर्चा
- रोहतक येथील अपना घर अनाथाश्रमातील गैरकृत्यांची आणि येथील मुलींच्या लैंगिक छळाची देशभर चर्चा झाली होती. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने छापेमारी करुन येथून 103 मुलींची सुटका केली होती.
- सीबीआय कोर्टासमोर या प्रकणातील 12 मुलींसोबत बलात्कार, लैंगिक शोषण आणि गर्भपात करण्यासारखे गंभीर आरोप झाले होते.
18 एप्रिलला ठरवले होते दोषी
- पंचकुला सीबीआय कोर्टाने 18 एप्रिल रोजी 9 आरोपींना दोषी ठरवले होते. कोर्टाने माजी बालविकास अधिकारी अंग्रेज कौर हुड्डा यांची निर्दोष मुक्तता केली.
- कोर्टाने जसवंती देवीची मुलगी सुषमा, चुलत बहीण शीला, सहकारी रोशनी, कर्मचारी रामप्रकाश सैनी, कौन्सलर वीना यांची शिक्षा अंडरगोन (ट्रायलदरम्यान तुरुंगात राहून शिक्षा पूर्ण) केली आहे.
राम रहिमला शिक्षा सुनवाणाऱ्या जजने दिला निर्णय
- बाबा राम रहिमला शिक्षा सुनावणाऱ्या पंचकुला सीबीआय कोर्टाचे जज जगदीप सिंह यांनी अपना घर प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.
केव्हा झाला होता अपना घरचा भांडाफोड
- अपना घरमधील तीन मुलींनी येथील अत्याचाराला वैतागून येथून पळ काढला होता. दिल्लीला गेलेल्या तीन मुलींनी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगासमोर आपली फिर्याद मांडली आणि तेथील मुलींना सोडवण्याची मागणी केली.
- राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या टीमने 9 मे 2012 रोजी अपना घरवर छापा टाकला होता. 103 मुलींची त्यांनी सुटका केली होती.
- सरकारने जून 2012 मध्ये हे प्रकरण सीबीआयला सोपवले होते.
- वकीलांनी सांगितल्यानुसार 12 मुलींनी सांगितले होते, की अनाथालयात त्यांच्यासोबत चुकीचे काम होते होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मुलीच्या शौर्याची कथा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.