आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा सर्वात चांगला जॉब होता, मुख्य आर्थिक सल्लागार पद सोडल्यानंतर म्हणाले सुब्रमण्यम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरविंद सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ 2017 मध्ये संपला होता. पण सरकारच्या आग्रहानंतरही ते या पदावर कायम होते.-फाइल - Divya Marathi
अरविंद सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ 2017 मध्ये संपला होता. पण सरकारच्या आग्रहानंतरही ते या पदावर कायम होते.-फाइल

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी सांगितले की, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम लवकरच अर्थ मंत्रालयाचा राजीनामा देऊन अमेरिकेला परतणार आहेत. जेटली यांच्या मते, सुब्रमण्यम यांनी हा निर्णय 'कौटुंबीक जबाबदाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे' घेतला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी हा आजवरचा सर्वात चांगला जॉब होता असे म्हटले आहे. सुब्रमण्यम 16 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले होते. 2017 मध्ये त्यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला. तो यावर्षी ऑक्टोबर महिन्यात संपणार होता. 


जेटली यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, काही दिवसांपूर्वी माझी अरविंद सुब्रमण्यम यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा झाली होती. सुब्रमण्यम यांनी सांगितले होते की, त्यांना अमेरिकेला परतायचे आहे. त्यांनी याचे काही खासगी कारणही सांगितले. त्यामुळे मी काही म्हणू शकलो नाही. सुब्रमण्याम यांना कुटुंब आणि ही जबाबदारी यापैकी एक निवडायचे होते. 


सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केले होते प्रश्न 
भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. जून 2016 मध्ये त्यांनी ट्वीट करत त्यांना आर्थिक सल्लागार पदावरून हटवण्याची मागणी केली होती. स्वामी यांनी आरोप केला होता की, अरविंद यांनी 2013 मध्ये अमेरिकेच्या संसदेत भारताच्या विरोधात कारवाईचे वक्तव्य केले होते. पण त्यावेळी जेटलींनी ते स्वामींचे वैयक्तिक मत असून अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर संपूर्ण विश्वास असल्याचे म्हटले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...