आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:ला चीफ जस्टिसचा मुलगा सांगायचा हा किलर, घरी कॉल गर्ल बोलावून करायचा अय्याशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरिदाबाद - पाटण्याचे प्रॉपर्टी डीलर प्रवीण विश्वकर्मा यांच्या मर्डर केसमध्ये क्राइम ब्रँचच्या टीमने मुख्य आरोपी वरुण ऊर्फ वर्धमान आणि त्याचा साथीदार गजेंद्र ऊर्फ टिल्लू याला अटक केली आहे. तो बाउन्सरसोबत महागड्या गाड्यांमध्ये बसून चीफ जस्टिसचा मुलगा बनून फिरत होता. चौकशीत आरोपी वरुणने सांगितले की, त्याला सुरुवातीपासूनच बॉलीवुड सेलिब्रिटीजची लाइफ स्टाइल खूप पसंत होती. त्याला त्यांच्यासारखे जीवन जगायचे होते.   


बिहारच्या सर्वात महागड्या शाळेतून घेतले शिक्षण...
-मुख्य आरोपी वरुणने बिहारच्या सर्वात महागड्या शाळेतून 12वीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्याचे वडील रणजित सिंह पाटणा कोर्टात पेशकार होते. त्याची गावात वडिलोपार्जित बरीच मोठी जमीन आहे.
- एकटा असल्याने घरचे वरुणचे खूप लाड करायचे. यामुळे त्याला खूप सूट मिळालेली होती. याचा फायदा उचलून तो नेहमी मुंबईला जात होता.
- तेथे फिल्मी सिताऱ्यांची लाइफस्टाइल पाहून तो प्रभावित झाला. त्यालाही त्यांच्यासारखेच आयुष्य जगायची इच्छा झाली.
- यासाठी त्याने 2016 मध्ये आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा सौदा वडिलांना न सांगता एका व्यक्तीशी केला. या सौद्यामध्ये मृत प्रवीण विश्वकर्मा होता.
- व्यवहाराच्या बदल्यात वरुणला 94 लाख रुपयेही मिळाले होते, परंतु रजिस्ट्री नंतर करू असे सांगण्यात आले होते. पैसे घेऊन तो मौजमस्ती करत फिरायला लागला. त्याने फॉर्च्युनर आणि इनोव्हा गाडी किरायाने घेतली.
- ऐट दाखवण्यासाठी तो आपल्यासोबत 4 बाउन्सरही ठेवू लागला. त्यांना वॉकी-टॉकीही घेऊन दिलेले होते. बाउन्सर्सना त्याने सांगितले होते की, तो सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसचा मुलगा आहे. 

 

लक्झरी लाइफ जगायचा वरुण
- वरुणने दिल्लीचा पॉश एरिया द्वारकामध्ये फ्लॅट घेतलेला आहे. घरात ऐशारामाच्या सर्व वस्तू होत्या.
- पोलिस चौकशीत पुढे आले ककी, तो 10-10 हजार रुपये देऊन कॉल गर्ल मागवून अय्याशी करायचा.
- त्याला मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवण्याचाही शौक होता. आपल्या 4 बाउन्सर्सला तो दररोज 1200 रुपये द्यायचा.

 

महिनाभर अंघोळ नाही करत, फिट्सही येतात...
- क्राइम ब्रँच डीएलएफचे इंचार्ज अशोक कुमार म्हणाले की, मुख्य आरोपी वरुण महिनाभर अंघोळही करत नव्हता. कारण त्याला पाण्यापासून अॅलर्जी आहे. अंघोळ करताच त्याच्या शरीरावर लाल खुणा उमटतात. याशिवाय त्याला फिट्सही येतात. 

 

संजय दत्त अन् राज कुंद्राची घेतली भेट
- वरुण म्हणाला की, डिसेंबरमध्ये तो फिल्म स्टार संजय दत्त आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्याशी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये 2 मिनिटांसाठी भेटला होता.
- त्याने दोघांना सांगितले होते की, त्याला फिल्म इंडस्ट्रीत गुंतवणूक करायची आहे, पण दोन्ही स्टार्सनी त्याला गांभीर्याने घेतले नाही, फक्त एवढेच म्हणाले की, आमच्या पीएशी बोलून घे.

 

असा झाला होता डीलरचा मर्डर
- पाटणाच्या बैरिए गावातील तसेच सम्पाचकचा रहिवासी प्रॉपर्टी डीलर प्रवीणला त्याचा परिचित वरुण सिंहने 29 नोव्हेंबरला फ्लाइटने दिल्लीला बोलावले आणि फरिदाबादमध्ये सुरजकुंड-पाली रोडवर पोटात गोळ्या झाडून हत्या केली होती.
- हत्याकांडात त्याच्या 4 बाउन्सर्ससह 5 जण सहभागी होते. प्रवीण आणि वरुणमध्ये तब्बल 94 लाख रुपयांच्या व्यवहार या मर्डरचे कारण ठरला. याआधी 9 डिसेंबर रोजी पोलिसांनी याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी वेस्टमध्ये राहणाऱ्या मोहम्मद इम्रान, उत्तमनगर दिल्लीत राहणारा मोहित आणि अगवानपुरचा राहणारा फिरोजला अटक केली होती.
- याप्रकरणी एक आणखी बाउन्सर रणधीरला अटक अजून झालेली नाही. त्याच्याविरुद्ध सूरजकुंड पोलिसांत कलम 302, 201, 120बी, 25/54/59 आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...