आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mob Lynching: मोदी जितके लोकप्रीय होतील, तितक्या वाढतील अशा घटना; केंद्रीय मंत्र्याचे विधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजस्थानच्या अलवर येथे गो तस्करीच्या संशयात जमावाकडून झालेल्या हत्येवर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बीकानेर येथून खासदार असलेले मेघवाल म्हणाले, अशा घटना वाढण्यामागे एक षडयंत्र आहे. मोदी जितके लोकप्रीय होतील, देशात अशा घटना तितक्याच वाढत राहतील. बिहारमध्ये निवडणूक प्रचार सुरू होता, त्यावेळी सुद्धा 'अवॉर्ड वापसी' गँग होती. उत्तर प्रदेशात मॉब लिन्चिंग सुरू होती. आता लोकसभा निवडणुका येत आहेत. त्या निमित्ताने असहिष्णुता सारखेच नवीन काही येईल. मोदींचे तोंडभर कौतुक करताना ते पुढे म्हणाले, की पीएम मोदींनी इतक्या मोठ्या प्रमाणात योजना आणल्या. त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येत आहे. त्यालाच मिळणाऱ्या ह्या प्रतिक्रिया आहेत. तर दुसरीकडे, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशात मोदींच्या नेतृत्वात लिंचराज सुरू असल्याची टीका यापूर्वीच केली. 


रुग्णालय गाठण्यापूर्वीच मृत्यू...
पोलिस अधीक्षक अनिल बेनिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबर आपल्या एका सहकाऱ्यासोबत 2 गायी घेऊन जात होता. त्याचवेळी गावातील काही युवकांनी त्याला घेरून शिवीगाळ सुरू केली. यानंतर जमाव वाढत गेला आणि त्यांना अकबरला मारहाण सुरू केली. कसाबसा त्याचा सहकारी घटनास्थळीवरून निघून गेला. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जमाव त्या व्यक्तीला मारहाण करत होता. त्याची वेळीच जमावाकडून सुटका करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले जात होते. परंतु, रुग्णालय गाठण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना अद्याप ती व्यक्ती गोतस्कर होती याचे पुरावे सापडले नाहीत. 


4 वर्षांपासून देशात 'लिंच राज'
या घटनेचा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी तीव्र निषेध केला. तसेच गेल्या 4 वर्षांपासून देशात मोदींच्या नेतृत्वाखाली लिंचिंग राज सुरू आहे असे ट्वीट केले. तर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कारवाईचे आश्वासन दिले. अलवारमध्ये घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेचा तीव्र निषेध करताना त्यांनी संबंधित जिल्ह्यातील प्रशासन आणि गृहमंत्रालयाला सुद्धा ताबडतोब कारवाईचे आदेश दिले. 


लिंचिंगवर कठोर सुप्रीम कोर्ट
देशात वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारांना फटकारले आहे. कुणालाही कायदा आपल्या हातात घेण्याचा अधिकार नाही. लोकशाहीला झुंडशाहीत बदलू दिले जाऊच शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...