आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: दगडफेक करणाऱ्या तरुणींना धडा शिकवणार 500 निर्भीड महिला कमांडोंची टीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोळ्यांवर पट्टी बांधून प्रशिक्षण घेताना महिला कमांडो... - Divya Marathi
डोळ्यांवर पट्टी बांधून प्रशिक्षण घेताना महिला कमांडो...

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन व्यूहरचना तयार केली आहे. यासाठी महिला कमांडोजची विशेष टीम तयार केली जात आहे. त्यांचे मुख्य कार्य आंदोलकांतील महिलांवर नियंत्रण मिळवणे असणार आहे. या विशेष टीमसाठी देशभरातील सैनिक आणि निमलष्करी दलातून 500 निर्भीड महिलांची निवड केली जात आहे. दहशतवाद विरोधी कारवाया आणि चकमक सुरू असताना आंदोलक दगडफेक करून सैनिकांच्या कारवाईत अडथळे आणतात. त्यातील महिला आंदोलकांना आवरणे पुरुष जवानांना शक्य होत नाही. त्यामुळेच महिला कमांडोंची ही विशेष तुकडी महिला आणि अल्पवयीन आंदोलकांवर नियंत्रण ठेवणार आहे. 


3 टप्प्यांमध्ये परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण
- यात सहभागी केल्या जाणाऱ्या 500 महिलांना विशेष प्रकारची ट्रेनिंग दिली जात आहे. त्यामध्ये दगडफेक करणाऱ्या आणि हिंसक आंदोलन करणाऱ्यांना आळा कसा घालता येईल हे सविस्तर समजावून सांगितले आणि दाखवले जात आहे. 
- एकूणच तीन टप्प्यांमध्ये परिस्थिती हाताळण्याची येथे ट्रेनिंग दिली जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात परिस्थितीचा आढावा घेणे आहे. दुसऱ्या टप्प्यात गर्दी वाढल्यास त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरल्या जाणारे तंत्र याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जमावावर बळाचा वापर करण्याची ट्रेनिंग होत आहे. 

 

डोळ्यांवर पट्टी बांधूनही ट्रेनिंग
विशेष महिला कमांडोंना रात्री सुद्धा कारवाया करताना कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नये यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून सुद्धा ट्रेनिंग दिली जात आहे. कुठल्याही क्षणी दहशतवाद विरोधी कारवाई आणि चकमक होऊ शकते यासाठी त्यांना तयार केले जात आहे. कधीही शस्त्रास्त्रांमध्ये बिघाड आल्यास अवघ्या काही मिनिटांत ते कसे दुरुस्त करता येईल अशी तयारी आहे. 


गृह आणि संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
जम्मू आणि काश्मिरातील घडामोडींवर विविध प्रकारचे अहवाल गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडे गेले आहेत. घुसखोर तसेच दहशतवाद्यांवर कारवाई सुरू असताना आंदोलक दगडफेक आणि हिंसाचार करून पोलिस आणि सैनिकांच्या कारवाईत अडथळे आणतात असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता. आंदोलक पुरुषांवर सैनिक आणि सुरक्षा रक्षक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, महिला आणि लहान मुलांनी दगडफेक केल्यास पुरुष सैनिक त्यांच्यावर योग्य कारवाई करू शकत नाहीत. त्याचाच गैरफायदा दहशतवादी घेत असून महिलांचा वापर वाढला असे निदर्शनास आले. त्यामुळेच, केंद्र सरकारने त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 500 महिला कमांडोंची टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...