आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • हे मुख्यमंत्री त्यांच्या नातवापेक्षाही गरीब This Chief Minister Is Poorer Than His Grand Son

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'Day Spl: हे मुख्यमंत्री त्यांच्या नातवापेक्षाही गरीब, तर पत्नीकडे आहे 92 लाखांची ऑडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्या पत्नीसह. - Divya Marathi
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्या पत्नीसह.

हैदराबाद/नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा 20 एप्रिल हा जन्मदिवस आहे. यानिमित्त DivyaMarathi.Com त्यांच्याविषयी ही खास माहिती देत आहे. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे चंद्राबाबू हे प्रत्यक्षात आपल्या नातवापेक्षा गरीब आहेत. विश्वास बसणार नाही परंतु, त्यांचा अडीच वर्षांचा नातू नारा देवांश हा 11 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे, तर त्याचे आजोबा चंद्राबाबू यांची एकूण प्रॉपर्टी 2.53 कोटी रुपये आहे. नायडू कुटुंबाकडून सादर करण्यात आलेल्या तपशिलातून ही माहिती समोर आली आहे.

 

अशी आहे नायडू कुटुंबाची संपत्ती

- नायडू आणि त्यांच्या कुटुंबाने 7व्यांदा आपल्या प्रॉपर्टीचा तपशील सार्वजनिक केला होता. यानुसार सीएम चंद्राबाबू नायडू यांच्यावर एकूण 5.84 कोटींचे कर्ज आहे, तर त्यांची संपत्ती 2.53 कोटी रुपये आहे.
- नायडू यांचा मुलगा नारा लोकेशने आपल्या कुटुंबाच्या संपत्तीचा तपशील देत म्हटले की, सीएम चंद्राबाबूंनी बँक ऑफ बडोदाकडून हाउसिंग लोन घेतलेले आहे. दुसरीकडे त्यांच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये 40 लाख रुपये आहेत.
- सीएम नायडू यांच्या नावावर 1.52 लाखांची अॅम्बेसेडर कार आणि 7.75 लाखांचे घर हैदराबादेत आहे, तर नातू देवांशकडे कॅशशिवाय हैदराबादेतील पॉश वस्ती ज्युबिली हिल्समध्ये साडे 9 कोटी रुपये किमतीचे घर आहे.

 
पत्नी सर्वात श्रीमंत
- दुसरीकडे, 25.41 कोटींच्या संपत्तीसह मुख्यमंत्र्यांची पत्नी भुवनेश्वरी नायडू कुटुंबात सर्वात श्रीमंत आहे.
- आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्री आणि टीडीपीचे महासचिव लोकेश म्हणाले की, नायडू कुटुंबाचा हेरिटेज फूड्सचा बिझनेस आहे आणि त्याची मॅनेजिंग डायरेक्टर त्यांची आई आहे. दुसरीकडे, नारा लोकेश यांनी स्वत:ची 15.21 कोटी रुपयांची संपत्ती सांगितली.
- याशिवाय नारा लोकेश यांची पत्नी आणि सीएमची सून नारा ब्राह्मनीकडे स्वत:ची 15.01 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्या हेरिटेड फूड्सच्या डायरेक्टर आहेत.


जगनमोहन यांच्यावर टीका
- लोकेश यांनी दावा केला की, देशात त्यांचेच कुटुंब असे आहे जे नियमित संपत्तीचा तपशील जाहीर करत आले आहे.
- त्यांनी विरोधी पक्षांनाही आपली संपत्ती घोषित करण्याचे आव्हान दिले आहे.
- मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र म्हणाले की, विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध अनेक आरोप केले, परंतु त्यांतील एकही कधीही सिद्ध झाला नाही.
- लोकेश यांनी विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डींवर टीका करताना म्हटले की, त्यांनी कधी आपली संपत्ती का जाहीर केली नाही!

 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...