आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरघोस पिकासाठी कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितला नामी उपाय; 'दिवसातून 20 मिनिटे करा वैदिक मंत्रोच्‍चार'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोव्यात पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी दिवसातून कमीत कमी 20 मिनिटे 'ओम रोम जूम साह' असा मंत्रोच्चार करावा. यासाठी मंगळवारी गोव्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी 'शिव योग कॉस्मिक फार्मिंग' नावाने एका योजनेचा शुभारंभही केला.

 

बाबा शिवानंद यांनी तयार केला आहे हा प्रोजेक्ट
- या प्रोजेक्टला बाबा डॉ. अवधूत शिवानंद यांनी तयार केले आहे. हे बाबा गुरुग्राम (गुडगाव) मध्ये शिव योग फाउंडेशन चालवतात. बाबा बनण्याआधी ते केमिकल इंजिनिअर होते. गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांच्या पत्नी ऊषा या बाबाच्या भक्त आहेत.

 

मंत्री म्हणाले- भरघोस पिकासाठी रॉक शोही आयोजित करू शकतो...
- मंत्री सरदेसाई म्हणाले, "यात शेतकऱ्यांना कोणताही खर्च येणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक कृषिमंत्री म्हणून मी सर्वकाही करायला तयार आहे." ते म्हणाले की, गरज भासल्यास मी रॉक शो किंवा ब्यूटी कॉन्टेस्टही शेतीबद्दलचे आकर्षण वाढावे म्हणून आयोजित करू शकतो.

 

मंत्र्याच्या पत्नी बाबाच्या कार्यशाळेत झाल्या सहभागी
- जानेवारीत मंत्र्याच्या पत्नी ऊषा यांनी विभागाचे कृषि निदेशक नेल्सन फिगेरिएडा यांच्यासोबत डॉ. शिवानंद यांच्या एका तासाच्या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. तेथे त्यांनी मातीतील शक्तीच्या लाभांची माहिती दिली. सरदेसाई यांनीही मीडियासमोर या कार्यशाळेत सहभाग घेतल्याला दुजोरा दिला.

 

व्हायरल होत आहे व्हिडिओ...
- मागच्या आठवड्यात गोव्याच्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ मिळाला. यात काही शेतकरी पाय दुमडून शिवानंद बाबासोबत बसून ध्यान करतात. यात बाबा म्हणतात की, भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून ब्रह्मांडातील शक्तीने शेताच्या चहुबाजूंनी पसरलेले नकारात्मक विनाशकारी ध्वनी कमी केले जात आहेत. यामुळे स्वस्थ बीजाचे अंकुरण होईल. दुसऱ्या व्हिडिओत बाबा शिवानंद एका रूममध्ये डॉक्टरों आणि वैज्ञानिकांना संबोधित करताना दिसत आहेत. यात ते तिसऱ्या डोळ्याची आध्यात्मिक एक्सरसाइज ही विज्ञानाच्या पलीकडे असल्याचे सांगतात.

 

शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा
- या प्रोजेक्टवरून शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पणजी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. यात शिव योग फाउंडेशनचे प्रतिनिधि शेतकऱ्यांना अध्यात्माची माहिती देणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...