आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षीय मुलीवर 18 नराधम 7 महिन्यांपासून करत होते रेप, Video बनवून केले ब्लॅकमेल; नव्या कायद्यानुसार ही होऊ शकते शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - अवघ्या देशात खळबळ उडवणारी घटना या वेळी चेन्नईतून समोर आली. 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थिनीवर 18 नराधम मागच्या 7 महिन्यांपासून बलात्कार करत होते. आरोपी नराधमांमध्ये इमारतीचा सिक्योरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबरही सामील आहेत. पोलिसांच्या मते, चिमुरडीला कथितरीत्या गुंगीचे औषध मिसळलेली कोल्ड ड्रिंक पाजली जात होती. पीडिता म्हणाली, 66 वर्षे वयाच्या लिफ्ट ऑपरेटरनेही तिच्यावर बलात्कार केला होता.


त्याने व्हिडिओ शूट केला आणि ब्लॅकमेल करू लागला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तथापि, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्‍सो अॅक्‍ट) मध्ये सुधारणा केल्या होत्या. चेन्नईच्या प्रकरणात दोन कंडीशन असू शकतात.

 

1 एप्रिलनंतरची घटना असेल तर थेट फाशी
बाल कायदे विशेषज्ञ विभांशु जोशी (मप्र) म्हणाले की, पॉक्सो अॅक्ट आणि आयपीसीमध्ये करण्यात आलेले नवे बदल 21 एप्रिलपासून लागू झाले आहेत. या तारखेपासून जो कोणी 12 वर्षे वा त्याहून कमी वयाच्या बालकांवर रेप करतो, त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. या तारखेच्या आधीचे प्रकरण असेल तर गँगरेपची जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेप लागू होते. चेन्नईच्या प्रकरणात पीड़िता चिमुरडी म्हणाली की, तिच्यावर मागच्या 7 महिन्यांपासून बलात्कार होत होता. पीड़िता बालिका जी तारीख नोंदवेल, त्यानुसारच ठरेल की आरोपींविरुद्ध कोणकोणती कलमे लागू होतील. तज्ज्ञ म्हणतात की, बालकांच्या प्रकरणात तर कोणी असेही म्हणू शकत नाही की, हे सर्व चिमुरडीच्या इच्छेने केले होते. हे कथन कोर्ट मान्यच करत नाही.

 

सर्वांनाच होऊ शकते फाशी
नव्या सुधारणा लागू झाल्यानंतर 12 वर्षे वा त्याहून कमी वयाच्या बालकांवर रेप केल्यावर आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावणे शक्य झाले आहे. सुधारणांच्या आधीपर्यंत आयपीसीचे कलम 376ए अंतर्गत रेपनंतर हत्या केल्यावरच मृत्युदंडाची तरतूद होती. संशोधनानंतर यात नवे कलम 376ए बी जोडण्यात आले आहे. यात चिमुरडीवर रेपनंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. जाणून घ्या पॉक्सो अॅक्टमध्ये सरकारने कोणकोणते नवे संशोधन केले आहेत? आणि असा गुन्हा केल्यावर आरोपीला काय शिक्षा होऊ शकते?

 

क्रिमिनल लॉ
> महिलेवर बलात्कार केल्यास कमीत कमी शिक्षा ही 7 ते 10 वर्षे करण्यात आली. ती जन्मठेपेत बदलली जाऊ शकते.
> 16 वर्षांहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केल्यास कमीत कमी शिक्षा 10 ते 20 वर्षे आहे. तीही जन्मठेपेपर्यंत वाढवली जाऊ शकते.
> 16 वर्षांहून कमी वयाच्या मुलीवर गँगरेप झाल्यास जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.
> 12 वर्षांहून कमी वयाच्या मुलीवर रेप केल्यास कमीत कमी 20 वर्षे कैद, जन्मठेप आणि मृत्युदंड शक्य.
> 12 वर्षांहून कमी वयाच्या मुलीवर गँगरेप झाल्यास जन्मठेपेसोबतच मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.

 

नव्या बदलांनंतर
- रेपच्या कोणत्याही प्रकरणाचा तपास 2 महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक झाले आहे.
- अशा केसेसची ट्रायलही 2 महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
- 16 वर्षांहून कमी वयाच्या मुलीवर गँगरेप वा रेप झाल्यास आरोपीला अग्रिम जामीन मिळणार नाही.
- 6 महिन्यांत याचिकेचा निपटारा करावा लागेल.
- पोलिस स्टेशन्स आणि हॉस्पिटल्सना स्पेशल फॉरेंसिक किट्स देण्याचीही तरतूद करण्यात आली होती.
- रेप केसेससाठी वेगळे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- आरोपीला आकारल्या जाणाऱ्या दंडातूनही पीड़ितेला उपचार आणि भरपाई देण्याची तरतूद आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या खळबळजनक घटनेतील नराधमांचे फोटोज व Video... 

 

 

बातम्या आणखी आहेत...