आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shame: बलात्काराच्या आरोपींकडून अख्ख्या गावाला दारू-मटणाची पार्टी, पंचायतीने दंड घेऊन गावकऱ्यांना वाटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जशपूर (छत्तीसगड) - छत्‍तीसगडच्या जशपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. घटना होती 3 मुलींची. पैकी दोन अल्पवयीन आहेत. त्यांना भरपंचायतीत उभे करून जाहीररीत्या त्यांच्या अब्रूचा सौदा करण्यात आला. हा समझौत्याचा सौदाही केवळ 30 हजार रुपयांत झाला. या 30 हजारांत 8 हजार रुपयांच्या बकऱ्याचे मटण अन् भात शिजवून पंचायतीला उपस्थित गावकऱ्यांना खाऊ घालण्यात आले. यानंतर सौद्याचे उरलेले 22 हजार 485 रुपये गावकऱ्यांना वाटण्यात आले.

 

हे प्रकरण जशपूर जिल्ह्यातील सन्ना परिसरातील एका गावाचे आहे. येथे न्यायाच्या नावावर मानवतेला काळिमा फासण्याचे क्रूर कृत्य खेळण्यात आले. मागच्या 28 जून रोजी 3 मुलींसह 3 मुले आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. त्यांना मुलींना शोधायला गेलेल्या कुटुंबीयांनीच पाहिले. यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. ही बाब पूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. शेवटी या प्रकरणाचा निर्णय ग्रामपंचायतीत करण्याचे ठरले. पंचायतीत 3 अल्पवयीन मुलींसह त्यांना पळवून नेणाऱ्या 3 मुलांना, दोन्ही कुटुंबांसहित गावातील इतर लोकांनाही बोलावण्यात आले.

 

1 जुलै रोजी पंचायतीच्या कोर्टात मुले आणि अल्पवयीन मुलींना पूर्ण कहाणी विचारली. 3 मुलांना या मुलींना पळवून नेणे व 2 दिवस बाहेर ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. भविष्या अशी चूक होऊ नये या अटीवर त्यांना 10-10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तिन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी सामाजिक कोर्टाला 'भातभीतर' म्हणून 30 हजार रुपये दिले आणि प्रकरणात समझौता झाला. दोष माफ झाला. भात-मटणाच्या पार्टीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला अन् प्रकरण मिटवण्यात आले.

 

तथापि, भातभीतर ही आदिवासी पाड्यांमधील अशी प्रथा आहे, ज्यात एखाद्या मोठ्या गुन्ह्याचे निराकारण पंचांच्या सहमतीने निर्णयानंतर शिक्षेच्या रूपात भात खाऊ घालून अन् दारू पाजून केले जाते. यात समाजाच्या लोकांनी 8 हजार रुपयांच्या बकऱ्याची मटण पार्टी केली. उर्वरित सर्व पैसे गावकऱ्यांत वाटून देण्यात आले.

 

या प्रकरणी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दोन पोलिस स्टेशनच्या टीमसोबत महिला सेलची टीमही गावकऱ्यांचे जबाब घेत आहे. या प्रकरणात गावातील सरपंचांसहित अनेक जणांचा समावेश आहे, यामुळे पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. पोलिस आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...