आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लहानग्याला 20 रुपयांसाठी पोलिसांनी झोडपले, जो आला त्याने हात साफ केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामपूर - एकीकडे हजारो कोटी रुपये गडप करुन नीरव मोदी निवांत आपल्या घरी बसला आहे. तर फक्त 20 रुपये चोरीचा आळ घेतलेल्या मुलाला पोलिसांसह दुकानदार आणि रस्त्याने ये-जा करणारे बेदम मारत होते. लहान मुलाला मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

उत्तर प्रदेशातील रामपुर जिल्ह्यातील एका उच्चभ्रू वस्तीतील बर्तन बाजारातील ही घटना आहे. संध्याकाळची नमाज अदा करण्यासाठी एक दुकानदार आपले दुकान उघडे सोडून नमाज पठण करण्यासाठी गेला होता. 


- प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, 10-12 वर्षांचा मुलगा तेव्हा दुकानातील गल्ल्यातून पैसे काढत होता. 
- चोरी करताना मुलाला शेजारील दुकानदाराने पाहिले आणि पकडले. 
- त्यानंतर दुकानदारासह सर्वांनीच त्याला मारण्यास सुरुवात केली. कोणी त्याच्या डोक्यात मारत होते तर कोणी गालांवर थप्पड लगावत होते. 
- तिथे पोहोचलेल्या पोलिसांनी गर्दीला आवरण्याऐवजी 10-12 वर्षांच्या त्या मुलाला दंडुक्याने मारण्यास सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...