आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्जास्पद: सर्पदंशाने मुलाचा मृत्यू, शेजारी महिलेने चेटूक केल्याचे म्हणत नग्न करून बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेनीपट्टी (मधुबनी) - बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टीच्या रजघट्टा गावात मो. शकील नदाफ यांच्या 10 वर्षीय मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. कुटुंबीयांना वाटले की, हे चेटकिणीचे कृत्य आहे. कुटुंबीयांनी सरपंच मो. आलम अन्सारीच्या इशाऱ्यावरून शेजारी राहत असलेल्या एका महिलेला घराबाहेर खेचले आणि गावातील मुख्य चौकात नग्न करून विजेच्या खांबाला बांधून बेदम मारले. महिलेला एवढी मारहाण झाली की, तिला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बेनिपट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

 

साप चावूनही दवाखान्यात नेले नाही, जादू-टोणा करत बसले
गावतील मो. शकील नदाफ यांच्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू 8 जुलैच्या रात्री सर्पदंशानंतर विष उतरवण्यासाठी करण्यात आलेल्या जादूटोण्यादरम्यान झाला. यानंतर 9 जुलै रोजी मृत बालकाच्या कुटुंबीयांनी शेजारच्या घरातील सदस्यांना शिवीगाळ केली. म्हणाले की, ही महिला चेटकीण आहे, हिनेच साप पाठवला. सर्व पीडितेला मृत मुलाला जिवंत करायला सांगू लागले.

 

गावाच्या सरपंचावर भडकावल्याचा आरोप
बर्री पंचायतचे सरपंच मो. आलम अन्सारी, मो. इस्लाम, मो. शकील, मो. बदरून, मो. मुस्लिम, मो. फिदुल नदाफ, जुलेखा खातून, शैरू निशा, जैनब खातून, अजमेरी खातून, नूरजहां खातून, मैमून खातून, मो. हासिम नदाफ, गुलशन खातून वन व गुलशन खातून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला म्हणाली की, सरपंचानेच सर्वांना माझ्याविरुद्ध भडकवले आहे.

 

घरात घुसून तोडफोड, रस्त्यावर फेकले सामान
हातात शस्त्रे घेतलेली जवळजवळ डझनभर माणसे बळजबरी घरात घुसली आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. घरातील सामान रस्त्यावर फेकू लागले. आरोपींनी पीडितेला धमकी दिली की, आमच्या मुलाला जिवंत कर अन्यथा तुला नग्न करून विष्ठा खाऊ घालू. त्यांनी पीडितेसोबतच तिच्या मुलांनाही मारहाण केली. यानंतर पीडितेला नग्न करून विजेच्या खांबाला बांधण्यात आले.

 

काय म्हणतात पोलिस?
डीएसपी पुष्कर कुमार म्हणाले की, बेनीपट्टी पोलिस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या या प्रकरणात आरोपींना अटक करून तुरुंगात टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंधश्रद्धेमुळे घडलेली ही घटना हृदयविदारक असून यातील सर्व आरोपींना कडक शासन होईल. पीडित महिलेला न्याय देण्यासाठी सर्व आरोपींवर कारवाई केली जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...