आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचल सीमेवर भारताच्या उपस्थितीला चीनचा विराेध; वादग्रस्त क्षेत्र असल्‍याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किबिथू (अरुणाचल)- अरुणाचल प्रदेशमधील असाफिला सीमारेषेवर भारतीय सैन्याच्या उपस्थितीवर चीनने विरोध दर्शवला असून हे क्षेत्र वादग्रस्त क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. भारताने मात्र चीनचा दोवा फेटाळला. 


अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किबिथूजवळ चिनी सैन्याच्या दाईमाई पोस्टवर १५ मार्चला बाॅर्डर पर्सनल बैठक झाली. यात चीन सैन्यातील पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. असाफिलामध्ये भारतीय सैन्याच्या वाढत्या संख्येचा उल्लेख करत दोन्ही बाजूने तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. भारतीय अधिकाऱ्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांच्या दाव्याला फेटाळले. अरुणाचल प्रदेशमधील सुंबासिरी हे क्षेत्र भारताचे असून येथे भारतीय सैनिक नियमित गस्त घालतात, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चीनच्या अधिकाऱ्यांनी ‘अतिक्रमण’ असा शब्द वापरला होता. या शब्दावर भारतीय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. आमच्या सैनिकांना भारतीय सीमारेषेची माहिती आहे. त्यामुळे नियमित येथे गस्त घातली जाईल. आसाफिलामध्ये सैनिकांचा विरोध करणे आश्चर्यचकित करणारे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...