आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरगोन (एमपी) - स्थानिक CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल)च्या फर्स्ट रिझर्व्ह बटालियनच्या जवानाने चारित्र्यावरील संशयावरून पत्नीला 50 वेळा चाकूने भोसकून हत्या केली. तो अहमदाबादहून 8 तासांत 450 किमीचा प्रवास करून गुरुवारी सकाळी घरी पोहोचला आणि हत्या केली. हत्येनंतर रक्ताने माखलेल्या पत्नीच्या मृतदेहाचा मोबाइलमधून फोटो काढला आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आपल्या मेहुण्याला व्हॉट्सअॅप केला. लिहिले- 'तुझ्या बहिणीला मी मारून टाकले आहे, येऊन तिचा मृतदेह घेऊन जा.' जवान अहमदाबादच्या वसई चौकीमध्ये तैनात होता.
पत्नीच्या हत्येसाठी जवानाने घेतली होती सुटी
- स्थानिक सीआयएसएफ परिसरातील ओल्ड कॉलनीत राहणारा जवान अनिल आपली पत्नी वैशाली (25) आणि 4 वर्षीय मुलीसेाबत राहत होता.
- 4-5 महिन्यांपासून आरोपी अनिलला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणेही झाली होती. त्याने पत्नीला घटस्फोटाची मागणी केली होती.
- अनिलची पोस्टिंग सध्या अहमदाबाद, गुजरातमध्ये होती. घटनेच्या दिवशीच तो 5 ते 11 जुलैपर्यंतची सुटी घेऊन सकाळी 6 वाजता बड़वाह (खरगोन) येथे आला होता. सर्वात आधी त्याने झोपेत असलेल्या पत्नीला दारावरची बेल वाजवून उठवले. यानंतर पत्नीशी जुन्या कारणांवरून वाद सुरू केला. पुन्हा घटस्फोटाची मागणी केली.
- वाद वाढल्यानंतर आरोपीने घरात ठेवलेल्या चाकूने तिच्या शरीरावर तब्बल 50 हून अधिक वेळा वार केले. वैशालीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
- घटनेच्या वेळी मुलगी झोपेत होती. घटनेनंतर आरोपीने स्वत:हून आपल्या सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना कॉल करून पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.
- त्याने आपल्या पत्नीच्या माहेरच्यांना फोन करून हत्या केल्याचे सांगितले.
- एसडीओपी मानसिंग ठाकूर, पोलिस स्टेशन प्रभारी शशिकांत चौरसिया यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले.
हत्येनंतर नातेवाईक आणि पत्नीच्या माहेरच्यांना माहिती देत होता आरोपी
- पत्नीची हत्ये केल्यानंतर अनिल बाल्कनीमध्ये येरझारा घालत मोबाइलवरून सहकारी, नातेवाईक आणि पत्नीच्या माहेरच्यांना माहिती देत होता.
- यादरम्यान, पोलिस पथक आल्यावर शेजाऱ्यांना माहिती मिळाली, तेव्हा मोठी गर्दी जमली. सूचनेनंतर दुपारी 3.30 वाजता मृत वैशालीचे आईवडील, भावासोबत इतर नातेवाईकही हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
- मृत विवाहितेचे वडील म्हणाले, 6 वर्षांपूर्वी मी माझ्या मुलीचे लग्न अनिलशी लावले होते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद जरूर व्हायचे, परंतु आमच्या मुलीच्या चारित्र्यावरून कोणताही वाद आमच्यासमोर आला नाही. एवढी मोठी घटना घडल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला आहे.
हत्येच्या आधी वडिलांना कॉल केला होता मुलीने
- वडील म्हणाले, सकाळी 8 वाजता मुलीचा फोन आला होता. ती पतीसोबतच्या भांडणाची माहिती देत होती. ती जवळजवळ 5 मिनिटे बोलली.
- भाऊ संदीप म्हणाला, दीदीचा फोन आल्यानंतर जवळजवळ 8.30 वाजता भावजीने हत्या केली. त्यानंतर तिच्या रक्तबंबाळ मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि म्हटला- हे येथून घेऊन जा.
- एसडीओपी ठाकूर म्हणाले, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तब्बल 50 वेळा चाकूचे वार केल्याची बाब समोर आली आहे. गळा, छाती आणि पोटावर खोल जखमा होत्या. हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos व Video..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.