आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Class 10th School Girl Gang Raped By 11 Students In Bihar Latest News And Updates

10वीच्या विद्यार्थिनीवर 11 मुलांनी केला गँगरेप, मदतीसाठी मोठ्याने ओरडली, पण कुणीच आले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा (बिहार) - बिहारच्या बगहामध्ये 10वीच्या विद्यार्थिनीवर विद्यार्थिनीवर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपी मात्र फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

 

पाशवी बलात्कारानंतर भीतीमुळे गप्प होती पीडिता
रिपोर्टनुसार, 17 वर्षीय पीडिता पश्चिमी चंपारणमधील एका सरकारी शाळेत शिकते. सामूहिक दुष्कृत्याची घटना 10 जुलै रोजी झाली होती, परंतु याची तक्रार 17 जुलैला पोलिसांत नोंदवण्यात आली. पीडिता गँगरेपच्या घटनेनंतर प्रचंड भ्यायलेली होती म्हणून ती आठवडाभर गप्पच राहिली.

 

शाळेचा फॉर्म भरण्यासाठी घरी पैसे आणायला जात होती विद्यार्थिनी
पीडित विद्यार्थिनी म्हणाली की, दुपारी शाळा सुटल्यानंतर ती परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे आणायला घरी जात होती. तेव्हा आरोपींनी तिला पकडून बळजबरी एका शेतात नेले. पीडिता म्हणाली की, मी मदतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरडा केला, परंतु कुणीही आले नाही. पीडित विद्यार्थिनी म्हणाली की, एकाला चांगलीच ओळखते. इतरांना समोर आल्यावर ओळखू शकते.

 

बलात्कारानंतर दिली धमकी
पीडिता म्हणाली की, 10 जुलैला दुपारी ती शाळेतून घरी जात असताना वाटेत आरोपींनी तिला घेरले आणि शेतात नेऊन बलात्कार केला. घटनेदरम्यान पीडिता बेशुद्ध झाली होती. तिला बेशुद्धावस्थेतच आरोपींनी धमकी दिली की, या घटनेचा उल्लेख कुणाजवळही करायचा नाही, अन्यथा तिच्या कुटुंबीयांना परिणाम भोगावे लागतील. घटनेनंतर पीडिता एवढी हादरली होती की, आठवडाभर ती कुणालाच काहीही बोलली नाही. परंतु मंगळवारी तिने आपल्या घरच्यांना आपबीती सांगितली.

पीडितेने बगहाच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून इतर फरार असलेल्या 10 आरोपींचा शोध सुरू आहे. बुधवारीच आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.

 

काय म्हणाले पोलिस?
एसपी अरविंद गुप्ता म्हणाले, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय होईल. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...