आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Assault: बारावीच्या विद्यार्थिनींवर 5 जणांकडून 3 दिवस बलात्कार; तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाली - हिमाचल प्रदेशच्या मनाली शहरात 5 युवकांनी एका 12 वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या नराधमांनी तिला डांबून सलग 3 दिवस पाश्वी अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी बारावीत असलेल्या 2 विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. कुल्लूच्या पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या दोघी 20 जून रोजी सापडल्या आहेत. सुरुवातीला त्या दोघींनी बलात्काराची तक्रार केली नाही. मात्र, चौकशी दरम्यान एकीने आपल्यावर पंजाबच्या 3 आणि 2 स्थानिक अशा एकूण 5 जणांनी बलात्कार केल्याचे सांगितले.  


काय म्हणाल्या पीडित मुली..?
मुलींनी सांगितल्याप्रमाणे, ही घटना 17 जून आणि 20 जून दरम्यानची आहे. पोलिसांनी पंजाबमध्ये बठिंडा येथून तीन युवकांना अटक केली आहे. उर्वरीत दोघे अजुनही फरार आहेत. एका प्रश्नाचे उत्तर देताना पोलिस अधिकारी अग्निहोत्री म्हणाल्या, कायद्यानुसार पीडित मुली अल्पवयीन असल्यास त्यांनी सहमती शारीरिक संबंध प्रस्थापित ठेवले तरीही तो बलात्कार मानला जाईल. आयपीसी आणि पोक्सो कायद्यानुसार, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...