आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक : सैनिकी शाळेच्या बाथरुममध्ये सापडला 9वीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅडेटला शिस्तभंग प्रकरणी शिक्षकांनी शनिवारी समज दिली होती. - Divya Marathi
कॅडेटला शिस्तभंग प्रकरणी शिक्षकांनी शनिवारी समज दिली होती.

बंगळुरु - कोडागु जिल्ह्यातील सैनिकी शाळेत 9वीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव एनपी चिंगप्पा (14) आहे. त्याचे वडील नागंदा टी पोवियाड हे एका शाळेत हॉकी कोच आहेत. चिंगप्पाचा खून करण्यात आला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ही घटना शनिवारी घडली.

 

कुटुंबियांनी मुलाचा मारेकरी सापडत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. हॉस्पिटल समोर मृतदेह ठेवून नातेवाईकांनी आंदोलन केले. कुटुंबियांचा आरोप आहे की सैनिका शाळा प्रशासनाने कोणतीही सूचना न देता मुलाचा मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवला होता. पोलिसांनी प्राचार्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

 

घटनेच्या दिवशी शिस्तभंग प्रकरणी शिक्षकांनी दिली होती समज 
- सैनिकी शाळेचे म्हणणे आहे, की 23 जून रोजी चिंगप्पाने शिस्तीचे पालन केले नव्हते. यासाठी एका शिक्षकाने त्याला समज दिली होती. त्याच दिवशी सायंकाळी शाळेच्या टॉयलेटमध्ये तो बेशुद्धीच्या आवस्थेत आठळला होता. 
- त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले. रात्री 8 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले होते. 
- शाळेचे म्हणणे आहे की आम्ही पोलिस तपासात संपूर्ण सहकार्य करत आहोत. 

 

बातम्या आणखी आहेत...