आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गोरखपूर - येथील रहिवासी इयत्ता 10वीत शिकणाऱ्या मुलाने उत्तर प्रदेशच्या डीजीपींच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट बनवले. एवढेच नाही, केस सॉल्व्ह करण्यासाठी यूपी पोलिसांना निर्देशही दिले. वास्तविक, या मुलाच्या मोठ्या भावाला कुणीतरी 45 हजार रुपयांचा गंडा घातला होता. परंतु पोलिसांत तक्रार दाखल होऊनही कोणतीही कारवाई होत नव्हती. यामुळे त्रस्त होऊन मुलाने हे पाऊल उचलले.
असे आहे प्रकरण...
रिपोर्टनुसार, मुलाच्या भावाला कुणीतरी दुबईत नोकरीचे आमिष दाखवून 45 हजार रुपये घेतले होते. परंतु त्या व्यक्तीने नोकरी तर लावली नाहीच, पैसे परत दिले नाहीत. म्हणून त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी कोणतीही अॅक्शन घेतली नाही. यामुळे त्रस्त होऊन तरुणाच्या 10वीत शिकणाऱ्या भावाने यूपीचे डीजीपी ओ. पी. सिंह यांच्या नावे ट्विटरवर अकाउंट बनवले. या अकाउंटवर डीजीपींचा फोटोही प्रोफाइल पिक्चर म्हणून अपलोड केला.
अन् पोलिस लागले कामाला...
मग काय, यूपी पोलिस लागले कामाला. पोलिसांनी त्याच्या भावाची केस गांभीर्याने घ्यायला सुरू केली. एवढी गांभीर्याने घेतली की, पोलिसांनी त्या गंडा घालणाऱ्याला तर पकडलेच, शिवय त्याच्याकडून रोख 30 हजार रुपये हस्तगतही केले.
असे उजेडात आले प्रकरण...
मुलाने बनावट डीजीपी बनून ट्विटरवर गोरखपूरच्या एसएसपींना याप्रकरणी लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि एसएसपींनी या आदेशांचे पालन केले.
हे प्रकरण सॉल्व्ह झाल्यानंतर गोरखपूर पोलिसांनी डीजीपी ऑफिसला याबाबत सांगितले आणि तेव्हा कुठे त्यांना कळले की, असा कोणताही आदेश देण्यात आलेलाच नव्हता.
असे पकडले मुलाला
मग काय, पोलिसांनी अकाउंटचा शोध घेतला. डीजीपींचे हे ट्विटर अकाउंट गोरखपूरच्या महराजगंज पोलिस स्टेशनच्या आजूबाजूलाच ऑपरेट होत असल्याचे कळले.
मग पोलिसांनी त्याला शोधून पकडले.
इन्स्पेक्टर म्हणाले, 'जेव्हा मुलाची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने सांगितले की, त्याला गावातील एका मुलाने ही आयडिया दिली होती. मग त्याने आपल्या मित्राच्या फोनवरून ट्टिवरवर यूपीच्या डीजीपींच्या नावे ट्विटर हंडल क्रिएट केले.'
या दोघांची कसून चौकशी करण्यात आली आणि कडक इशारा देऊन सोडून देण्यात आले. शाळकरी मुलाने पोलिसांकडून असे काम करून घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.