आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेत तरूणीसोबत गँगरेप, दोन तरूणांनी तोंड दाबून केले दुष्कर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- दिल्लीहून रांचीला येणार्या एका तरूणीवर चालत्या ट्रेनमध्येच गँगरेप झाल्याची घटना घडली. पीडित तरूणीने भीतीपोटी याविषयी कोणालाच काहीच सांगितले नाही. आपल्यासोबत घडलेल्या घटनेने तरूणी एवढी खचली होती की, तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत तरूणाला रूग्नालयात दाखल करण्यात आले. शुद्धीत आल्यानंतर तिने पोलिसांना आपल्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सांगितले. यावर मुख्यमंत्री रघुवर दास यांनी ट्विट करून म्हटले की, कुठल्याच किमतीत दोषी वाचणार नाहीत.

 

घटनेमुळे तरूणी एवढी घाबरलेली होती, की तिने आपल्योसोबत घडलेल्या प्रकाराविषयी कोणालाच काहीच सांगितले नाही. 8 फेब्रुवारीला तरूणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. तिथे सुद्धीत आल्यनंतर 15 फेब्रुवारीला तरूणीने पोलिसाना जबाब दिला. यानंतर हे प्रकरण समोर आले.


या संबंधी मुख्यमंत्री रघुवरदास यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्लीहून रांचीला येणाऱ्या ट्रेनमध्ये एका मुलीवर दुष्कर्म झाल्याची बातमीमुळे मन द्रवित झाले आहे. मुलीला प्रत्येक शक्य मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. दोषींना कुठल्याच किमतीत सोडण्यात येणार नाही.


पुढील स्लाइडवर पाहा चालत्या गाडीत केला गँगरेप...

बातम्या आणखी आहेत...