आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • योगींनी घेतली संजय दत्तची भेट Cm Yogi Varanasi Panchkroshi Yatra

योगी आदित्यानाथ वाराणसी दौऱ्यावर: 'संपर्क फॉर समर्थन' अभियानात घेतली संजय दत्तची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगींच्या वाराणसी दौऱ्यावेळी शनिवारी सायंकाळी 4 ते 7 नौका विहार बंद करण्यात आला आहे. - Divya Marathi
योगींच्या वाराणसी दौऱ्यावेळी शनिवारी सायंकाळी 4 ते 7 नौका विहार बंद करण्यात आला आहे.

वाराणसी - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारपासून दोन दिवसांच्या वाराणीसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी त्यांनी बॉलिडवूड अभिनेता संजय दत्तची भेट घेतली. संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत ही भेट होती. 

 

योगी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर 
- मुख्यमंत्री वाराणसीमध्ये 4 तासांत 25 किलोमीटर यात्रा करणार आहेत. त्याशिवाय ग्राम स्वराज्य अभियान आणि विशेष संपर्क अभियानांतर्गत काही लोकांची भेट घेणार आहेत. 
- मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी 4 ते 7 पर्यंत गंगेत नौका विहार बंद ठेवण्यात येणार आहे. 
- पोट निवडणुकीतील पराभवावर उपमुख्यमंत्री शर्मा म्हणाले, पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणूक यात खूप फरक असतो. पोटनिवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर आणि आघाड्यांची निवडणूक असते. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळेल. 

 

संपर्क फॉर समर्थन: संजय दत्तची घेतली भेट 
- 'संपर्क फॉर समर्थन' अभियानांतर्गत योगींनी शनिवारी मुख्यमंत्री निवासस्थानी अभिनेता संजय दत्तची भेट घेतली. योगींनी त्यांना मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेणारी पुस्तिका भेट दिली. 
- संजय दत्त आणि योगी यांच्यात चित्रपट, शूटिंग या विषयांवर चर्चा झाली. 
- दुसरीकडे, केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी संपर्क फॉर समर्थन अभियानात भोजपुरी गायक हीरालाल यादवची वाराणसीमध्ये भेट घेतली. 

बातम्या आणखी आहेत...