आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोईम्बतूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे षडयंत्र रचल्याच्या आरोपात पोलिसांनी मोहम्मद रफीक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. कोर्टाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशीही माहिती आहे, की मोहम्मद रफीक हा कोईम्बतूर साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. या प्रकरणात त्याला शिक्षा देखील झाली होती. मोदींना मारण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात रफीकचा आवाज असल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आले आहे.
न्यूज एजन्सींने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे, की रफीक एका व्यापाऱ्यासोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवर चर्चा करत होता. अचानक तो धमकीच्या सुरात म्हणाला, 'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपवण्याची योजना आखली आहे. लालकृष्ण अडवाणी 1998 मध्ये कोईम्बतूरला आले होते, तेव्हा आम्हीच बॉम्ब पेरले होते.'
माझ्यावर अनेक केसेस
- फोनवरी बातचीत दरम्यान धमकी देणारी व्यक्ती म्हणते, 'माझ्यावर अनेक केसेस आहेत. 100 पेक्षा जास्त गाड्या फोडल्या आहेत.'
व्यावसायिकाने सोशल मीडियावर शेअर केला ऑडिओ
- पैशाच्या देवाण-घेवाणीसाठी आलेला ऑडिओ व्यावसायिकाने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला.
कोईम्बतूर सीरियल ब्लास्टमध्ये 58 जणांची हत्या
- कोईम्बतूर सीरियल ब्लासमध्ये रफीकला शिक्षा झाली होती. या ब्लास्टमध्ये 58 जणांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.