आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.आंबेडकरांच्या मूर्तीला दिला भगवा रंग, विरोधानंतर त्यावर पुन्हा चढवला निळा रंग!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबेडकरांच्या भगव्या मूर्तीला रंगवले निळ्या रंगात. - Divya Marathi
आंबेडकरांच्या भगव्या मूर्तीला रंगवले निळ्या रंगात.

बदायूं - बदायूं जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला भगवा रंग देण्यात आला होता. पण गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर बसपा जिल्हाध्यक्ष हेमेंद्र गौतम यांनी मंगळवारी पुन्हा या मूर्तीला निळा रंग दिला. रविवारीवारी गौतम यांनीच मूर्तीचे अनावरण केले होते. पण तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. 


येथील दुगरय्या गावात काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तोडली होती. त्यामुळे स्थानिकांनी चांगलाच गदारोळ केला होता. त्यानंतर याठिकाणी नवी मूर्ती लावण्यात आली होती. त्या मूर्तीचा रंग भगवा होता. सर्वांनाच भगव्या रंगातील मूर्ती पाहून आश्चर्य वाटले, पण तेव्हा कोणीही विरोध केला नाही. 


भाजपचा संबंध नाही 
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेम स्वरूप पाठक यांचे म्हणणे आहे की, या घटनेशी भाजपचा काहीही संबंध नाही. पण गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तेव्हाही त्यांचा पोषाख भगवा होता. तसेच सूर्याच्या उद्य किंवा अस्तालाही भगवा रंग असतो. हे भारताच्या संस्कृतीचे प्रतिक आहे, असे ते म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...