आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Complaint Filed Against Nawazuddin Siddiqui For Abusing Rajiv Gandhi In Sacred Games

Sacred Games: राजीव गांधींबद्दल अपशब्द काढल्याच्या आरोपावरून नवाजुद्दीन सिद्दीकीविरुद्ध तक्रार दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता - नेटफ्लिक्सवर Sacred Games ही वेबसीरिज येऊन अवघे 5 दिवस उलटले आहेत. परंतु हा शो आगमनाबरोबरच वादात सापडला आहे. नेटफ्लिक्सवर भारताची पहिली ओरिजिनल वेब सीरिज असा प्रचार होत असलेल्या या शोमध्ये अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत. 

सेक्रेड गेम्समध्ये निर्माता नवाजुद्दिन सिद्दीकीद्वारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरुद्ध अपशब्द काढल्याच्या आरोपावरून कोलकात्याच्या काँग्रेस नेत्याने लेखी तक्रार दाखल केली आहे. राजीव सिन्हा असे या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. मंगळवारी त्यांनी गिरीश पार्क पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करून कोलकाता पोलिस हेडक्वार्टरलाही प्रत पाठवली. 

 

काय म्हणतात तक्रारदार?
राजीव म्हणाले, नेटफ्लिक्सवर सेक्रेड ग्रेम्स सीरियलीमध्ये नवाजुद्दीनने माजी पंतप्रधानांना शिवीगाळ केली, तसेच तत्कालीन काळातील परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. राजीव म्हणाले की, इंटरनेटवर चालणाऱ्या या सीरियलचे लाखो प्रेक्षक आहेत. निर्माता नवाजुद्दीनने जाणूनबुजून राजीव गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नही केला आहे.

त्यांनी यासंबंधित वादग्रस्त व्हिडिओ क्लिपही पोलिसांना दिली आहे.

 

काय म्हणतात पोलिस?

पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, राजीव सिन्हा यांनी जी क्लिप दिली आहे, तिचा तपास सुरू आहे. यानंतर तक्रार दाखल करून योग्य ती कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...