आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघालयमध्ये दोनच जागा जिंकूनही भाजप स्थापणार रालोआचे सरकार, 6 मार्चला शपथविधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप सरचिटणीस राम माधव यांनी एनडीपीपीच्या आमदारांची भेट घेतली. - Divya Marathi
भाजप सरचिटणीस राम माधव यांनी एनडीपीपीच्या आमदारांची भेट घेतली.

नवी दिल्ली - त्रिपुरात मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर भाजप आता नागालँड आणि मेघालयमध्येही रालोआचे सरकार स्थापन करत आहे. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी आघाडीने रविवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला.

 

दुसरीकडे, मेघालयमध्ये भाजप-एनपीपी आघाडीला राज्यपालांनी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. एनपीपीचे अध्यक्ष कोनराड संगमा राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. ते सहा मार्चला शपथ घेतील. यूडीपीने रालोआला पाठिंबा देण्याची घोषणा केली. यूडीपीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दोनकुपर रॉय यांनी सांगितले की, एनपीपीचे नेते कोनराड संगमा हेच मेघालयचे मुख्यमंत्री होतील. ते काँग्रेससोबत काम करू शकत नाहीत.

 

रालोआ सरकार स्थिर राहील आणि तेच राज्याच्या हिताचे असले. तत्पूर्वी भाजप नेत्यांनी रॉय यांची भेट घेतली. भाजप नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितले की, राज्यात रालोआचेच सरकार स्थापन होईल. यूडीपीने कुठलीही मागणी केलेली नाही. आमच्याकडे २९ आमदार आहेत. आणखी काही येतील.


काँग्रेसचा दावा- सरकार स्थापन करण्याचे पहिले निमंत्रण आम्हाला मिळावे 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, सीपी जोशी, अहमद पटेल यांनी शनिवारी मेघालयाचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर कमलनाथ म्हणाले होते, 'आम्ही राज्यपालांची भेट घेतली. निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचे पहिले निमंत्रण हे आम्हाला मिळाले पाहिजे. जनादेशाचा सन्मान झाला पाहिजे. भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. सहाजिक आहे की जनतेने त्यांना नाकारले आहे.'

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, मेघालय व नागालँडमध्‍ये कसे होईल सरकार स्‍थापन...

बातम्या आणखी आहेत...