आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मदतीसाठी ओरडत होती तरुणी, तमाशा पाहत उभे होते लोक, एका पोलिसाने दिले जीवदान Constable Rescues Young Girl As Public Watches Her Die

मदतीसाठी ओरडत होती तरुणी, फक्त तमाशा पाहत होते लोक, एका पोलिसाने दिले जीवदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - रविवारी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना पाहायला मिळाली. खोल विहिरीत पाय घसरून पडलेली तरुणी मदतीसाठी ओरडून मदत मागत होती. परंतु आसपासचे लोक उभे राहून तमाशा पाहत होते. अशा कठीण प्रसंगी यूपी पोलिसांतील जवानाने धाडस दाखवत तरुणीला बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्येही पोहोचवले. 

 

असे होते प्रकरण
- वाराणसीच्या रोहनियां परिसरात रविवारी दुपारी एक तरुणी कोरड्या आणि खोल विहिरीत पडली. अचानक पडल्यानंतर तिने मदतीसाठी जोरजोरात पुकारा सुरू केला. परंतु कुणीही तिला वाचवायला पुढे आले नाही. काही वेळानंतर ती तरुणी थकून बेशुद्ध झाली, तरीही लोक फक्त पाहतच राहिले. 
- विहिरीजवळ गर्दी जमा होत राहिली, परंतु लोकांनी स्वत:हून कोणतीही अॅक्शन घेण्याचा विचारसुद्धा केला नाही.
- सूचना मिळताच तेथे पोहोचलेल्या यूपी पोलिसांतील कॉन्सटेबल सौरभ सिंह यांनी लगेच एक दोरी मागवली. एक टोक झाडाला बांधून दुसरे स्वत:च्या कमरेला बांधले आणि विहिरीत उतरले. असेच त्यांनी तरुणीला बाहेर काढले. 
- तरुणीला बेशुद्धावस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता तिची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
- घटनास्थळी असलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी कॉन्स्टेबलचे आभार मानले, तर गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...