आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराला बाथरूममध्ये भेटायला गेली पत्नी, पतीने पाहिल्यावर दोघांनीही घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीला अवैध संबंधांची माहिती मिळाल्याने पत्नी व प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. - Divya Marathi
पतीला अवैध संबंधांची माहिती मिळाल्याने पत्नी व प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मलसीसर/झुंझुनूं - पतीने शनिवारी रात्री घराच्या बाथरूममध्ये पत्नीला प्रियकरासोबत पाहिले. यामुळे घाबरून जाऊन विवाहितेने रविवारी सकाळी प्रियकरासह झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. खोहरीची रहिवासी नानू देवी ऊर्फ अन्नूच्या मोबाइलवरून सकाळी 4 वाजता तिचा प्रियकर भंवरलालला कॉल गेल्याचे रेकॉर्ड आढळले आहे. यावरून पोलिसांसह दोन्ही कुटुंबांनी कयास लावला आहे की, अन्नूनेच भंवरलालला फोन करून बोलावले आणि एका शेतात दोघांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांमध्ये मागच्या 3-4 वर्षांपासून अवैध संबंध होते. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

 

असे आहे प्रकरण...
- राजस्थानच्या टमकोरजवळील खोहरी गावातील रहिवासी नानू देवी ऊर्फ अन्नू व तिचा शेजारी भंवरलाल यांनी रविवारी सकाळी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
- ज्या दोरीने फास बनवला, ती काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीने घराच्या हौदातून पाणी काढण्यासाठी आणली होती. दोघांमध्ये मागच्या 3 ते 4 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.
- अन्नूचा पती महेंद्र म्हणाला की, तो साडे तीन वर्षांपासून जेद्दाहमध्ये (सौदी अरब) ड्रायव्हरचे काम करतो. दोन महिन्यांपासून सुटी घेऊन आला होता. घराचे बांधकाम सुरू होते.
- महेंद्र म्हणाला, शनिवार रात्री तो आणि अन्नू मोबाइलवर चित्रपट पाहत होते. 10 वाजता बाथरूम आल्याचे सांगून अन्नू रूममधून गेली. तोही लघुशंकेसाठी गेला.
- घरातच असलेल्या बाथरूममध्ये लाइट नसल्याने तिथे खूप अंधार होता. अन्नूला तो टॉर्च लाव म्हटला तेव्हा ती म्हणाली, टॉर्च नीट लागत नाहीये, तुम्ही रूममध्ये चला.
- महेंद्रने सांगितले की, त्याने अन्नूकडून घेऊन टॉर्च पेटवली आणि बाथरूमचे अर्धवट उघडलेले दार पूर्ण उघडले, तेव्हा आतमध्ये त्याचा शेजारी भंवरलाल उभा होता. महेंद्रला पाहताच भंवरलाल पळून जाऊ लागला.
- भंवरलालचा भाऊ रोहताशला त्याने फोन केला, परंतु तोपर्यंत तो तिथून निघून गेला होता. तेव्हाच महेंद्रला आपल्या पत्नी व शेजाऱ्यातील अवैध संबंधांवर संशय आला, पण तो दोघांना तेव्हा काहीच म्हटला नाही. यानंतर महेंद्र आणि अन्नू रूममध्ये झोपी गेले.
- महेंद्र म्हणाला की, रात्री एक वाजता त्याला झोप लागली. साडेसहा वाजता उठला तेव्हा अन्नू घरात नव्हती. तेव्हा त्याला ती भंवरलाल सोबत पळून गेल्याचा संशय आला. त्यांना शोधतच तो टमकोरला गेला.
- रोहताशला फोन केला तेव्हा त्याने भंवरलालही घरी नसल्याचे सांगितले. यादरम्यान त्याला एकाने कळवले की, अन्नू आणि भंवरलालने घराजवळच एका शेतात झाडाला गळफास घेतलेला आहे.

 

रात्री परत घरी येऊन झोपला होता भंवरलाल 
- भंवरलालचा मोठा भाऊ रोहताश म्हणाला की, कामावर जायचे असल्याने त्याला 4 वाजताच उठवले होते. तो तयारी करत होता तेवढ्यात त्याचा फोन खणखणला.
- फोनवर बोलणे झाल्यावर तो कामावर जाणार नाही असे सांगून घराबाहेर पडला. नंतर तो आणि अन्नू झाडाला लटकलेले असल्याची माहिती मिळाली.
- तथापि, त्यांना तेव्हाच संशय आला होता, जेव्हा रात्री महेंद्रने फोन करून सांगितले की, भंवरलाल त्यांच्या बाथरूममध्ये शिरला आहे. तो महेंद्रच्या घरी गेला तेव्हा तो तिथे नव्हता. घरी येऊन पाहिले तेव्हा भंवर झोपी गेलेला होता.

 

एक तास सुरू होता मोबाइल कॉल 
- भंवरलालच्या खिशातून दोघांचे मोबाइल आढळले, तपासात माहिती मिळाली की पहाटे 4 वाजता अन्नूच्या मोबाइलवरून भंवरच्या मोबाइलवर केलेला कॉल तब्बल 1 तास सुरू होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...