आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलिसाकडून मारहाण Cricketer Ravindra Jadeja Wife Complaint Physically Assault Against Policeman

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलिसाकडून मारहाण, बाइकला कार धडकल्याने झाला होता वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला गुजरातच्या जामनगरमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने मारहाण केली. - Divya Marathi
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला गुजरातच्या जामनगरमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने मारहाण केली.

जामनगर - क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला गुजरातच्या जामनगरमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने मारहाण केली. रिवाबाची बीएमडब्ल्यू कार पोलिस कर्मचाऱ्याच्या बाइकला धडकली होती. रिवाबाचा आरोप आहे की, पोलिसाने त्यांचे केस पकडून खेचले आणि डोके कारवर आदळले. रिवाबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. 

 

लोकांची गर्दी पाहून घटनास्थळावरून पळून गेला आरोपी
- रिवाबा म्हणाल्या, सोमवारी संध्याकाळी 7 वाजता त्या आपल्या कारने शरू सेक्शन रोडवरून जात होत्या. तेवढ्यात पोलिस मुख्यालयावरून बाइकवर एक पोलिस कर्मचारी निघाला. त्यांच्या कारची त्या बाइकला धडक बसली. यावर पोलिस कर्मचाऱ्याने वाद घालायला सुरुवात केली. त्यांचे केस पकडून कारमधून बाहेर खेचले. हे सर्व पाहून लोकांची गर्दी जमू लागली. हे पाहून आरोपीने घाबरून तेथून पळ काढला.
- हल्ल्यानंतर रिवाबा थेट एसपी कार्यालयात पोहोचल्या आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.

 

पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे आरोपी
- हल्लेखोराची ओळख सिटी सी डिव्हिजन पोलिस स्टेशनमध्ये तैनात कॉन्स्टेबल संजय करंगियाच्या रूपात झाली आहे. त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.

आरोपीने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचाही प्रयत्न केला...
- सूत्रांनुसार, घटनेनंतर आरोपीने दुर्घटनेत स्वत:ला जखमी असल्याचे भासवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी गेला होता. परंतु कोणतीही दुखापत नसल्याने त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. यानंतर तो फरार झाला.
- जामनगर एसपी प्रदीप सेजुल यांनी घटनेला दुजोरा देत म्हटले की, याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.

 

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही बंद 
- शहर पोलिस मुख्यालयाजवळ ही घटना झाली आहे. पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन कॅमेरे बंद आढळले. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...