आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसाठी त्यांनी स्वीकारली देशसेवा, 9 गोळ्या लागूनही दहशतवाद्यांना केले होते ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतन यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या बालपणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडल्याने तिच्यासाठी युनिफॉर्म सर्व्हीसमध्ये प्रवेश करावा लागला. 


भोपाळ - काश्मीरच्या बांदीपुरामध्ये 14 फेब्रुवारी 2017 रोजी चकमकीत 9 गोळ्या लागल्यानंतरही दहशतवाद्यांनी कंठस्नान घालणारे सीआरपीएफचे कमांडिंग ऑफिसर चेतन चीता यांनी खरं तर गर्लफ्रेंडसाठी म्हणून सीआरपीएफ जॉइन केले होते. आमच्या प्रतिनिधी रश्मी प्रजापती खरे यांच्याबरोबर नुकत्याच झालेल्या चर्चेत त्यांनी याबाबत खुलासा केला. 


काय म्हणाले चेतन चिता..
- चेतन म्हणाले की, माझे वडील नागरी सेवांमध्ये होते. त्यामुळे मलाही नेहमी त्याच क्षेत्रात जाण्याची इच्छा होती. 
- माझ्या बालमैत्रिणीवर माझे प्रेम जडले तेव्हा तिच्यासाठी मला युनिफॉर्म सर्व्हीसेस मध्ये यावे लागले.
- उमाचे वडील आर्मीमध्ये होते. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, माझ्या वडिलांशी बोलायचे असेल तर आधी वर्दी मिळवाली लागेल. मग काय मी लगेचच सीआरपीएफ जॉइन केले. 
- आमच्या कुटुंबीयांनी आंतरजातीय विवाहाच्या नावाने फार विरोध केला, पण मी दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही हे स्पष्ट सांगितले होते. 
- उमाच्या प्रेमाने मला लष्करात येण्यासाठी प्रोत्साहीत केले असे म्हणता येईल. 


प्रसिद्धीमुळे त्रस्त झालो... 
- मी देशावर जेवढे प्रेम करतो तेवढेच कुटुंबावरही करतो. 9 गोळ्या लागल्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे मला जीवनातील एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचवले. 
- लोक नेहमी मला घेराव घालतात. एखाद्या हिरोप्रमाणे स्वागत करतात. मला कुठे एकटे फिरणेही शक्य होत नाही. पण या सर्वामुळे असे झाले आहे की, माझे कौटुंबीक जीवन काहीसे विखुरले गेले आहे. 


संगीत आवडते... 
- मी एक संगीतप्रेमी आहे. भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच मला बॉलिवूड आणि जॅझ असे सर्व प्रकारचे म्युझिक आवडते. 
- माझ्या म्युझिक कलेक्शनमुळे नेहमी माझ्या मोबाईलची मेमरी फुल असते. संगीत हे उत्कृष्ट स्ट्रेस बस्टर आहे. 
- क्रिकेट आणि स्क्वॅश खेळणे हा माझा आवडता टाइमपास आहे. यंगस्टर्स आर्मी नेव्हीच्या ऐवजी मोठे पॅकेज आणि हाय फाय लाइफस्टाइलचे जॉब निवडतात. 
- मला तचे चूक वाटत नाही. कारण आजच्या काळात पैसाच सर्वकाही नसला तरी आनंद मिळवण्यासाठीच्या काही बाबी त्यातून नक्कीच मिळवता येतात. 
- आपल्या देशातील सिस्टीम खूप चांगली आहे. पण फोर्सेससाठी बजेट फार कमी असते. ते सुधारायला हवे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...