आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cruelty रडणारे मूल शांत होत नव्हते म्हणून आंगणवाडी सेविकेने त्याला चारली मिरची पावडर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - आंध्रप्रदेशात आंगणवाडी सेविकेने रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी त्याला लाल मिरची पावडर खाऊ घातली. हे प्रकरण कृष्णा जिल्ह्यातील भुसनगुला गावातील आहे. आई मुलाला बळजबरी आंगणवाडीत घेऊन गेली होती. त्यामुळे बाळ रडत होते. पण बराच वेळ बाळ शांत झाले नाही तर, आंगणवाडी सेविकेने तिला लाल मिरची पावडर खाऊ घातली. पोलिसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

 
मुलाची रडून रडून वाईट अवस्था झाली 
न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार आरोपी महिलेचे नाव व्ही. कुमारी आहे. बाळाला आंगणवाडी केंद्रात जायचे नव्हते. पण आई त्याला बळजबरी सोडायली गेली. त्यावेळी ते बाळ रडत होते. त्याला रडतच सोडून आई घरी गेली. पण त्यानंतरही त्या मुलाचे रडणे बंद झाले नाही तर व्ही कुमारी यांना राग आला आणि रागात त्यांनी लाल मिरची पावडर त्याला खाऊ घातली. त्यामुळे हे बाळ आणखी जोरात रडू लागले. 

 
स्थानिक लोकांना कळले 
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकूण स्थानिक गावातील लोक आंगणवाडी केंद्रावर पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी लहान मुलाच्या तोंडाला मिरची पावडर लागलेली पाहिली. त्यामुलाची रडून रडून अगदी वाईट अवस्था झाली होती. त्याचवेळी स्थानिकांनी मुलाच्या नातेवाईकांना माहिती दिली. 

 
महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल 
या घटनेबाबत मुलाच्या नेतावाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी आंगणवाडी वर्कर व्ही कुमारीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगिण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...