आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळ्याची तोडफोड करणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात : महबूबा मुफ्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- देशातील विविध भागांत राजकीय नेत्यांच्या पुतळ्याची तोडफोड होत असल्याच्या घटनांवर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी चिंता व्यक्त केली. अशा घटना भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.  महबूबा यांनी टि्वटमध्ये म्हटले की, देशभरातील पुतळ्यांची तोडफोड करणे ही प्रवृत्ती हुल्लडबाजी दर्शवते. अशा प्रकारची गुंडगरी कायद्याच्या विरोधात आहे. भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवणारे हे कृत्य आहे. त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर लगेच अागरतळातील बेलोनिया शहरात सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट नेते लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला. त्यानंतर जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगालमधील पुतळ्याचे मुंडके उडवण्यात आले. तामिळनाडूतील वेल्लोर शहरात पेरियार यांचा पुतळाही फोडण्याचा प्रयत्न झाला होता.

बातम्या आणखी आहेत...