आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • लज्जास्पद : रेल्वेखाली शिक्षकाचा कटला पाय, मदतीऐवजी लोकांनी शूट केला Video Cut The Teacher's Legs Off The Train

लज्जास्पद : रेल्वेखाली शिक्षकाचा कटला पाय, मदतीऐवजी लोकांनी शूट केला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बक्सर (पाटणा) - दानापूर रेल्वे मंडळातील डुमरांव रेल्वे स्टेशनच्या जवळ रविवार सकाळी एक शिक्षक तुफान एक्स्प्रेसखाली आला. दुर्घटनेत त्यांचा उजवा पाय घोट्यापासून कटला. या दुर्घटनेनंतर लोकांची गर्दी जमा झाली, परंतु त्यांना मदत करण्याऐवजी लोकांनी मोबाइलमधून फोटो व व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. अर्धा तास ते ट्रॅकवर तसेच वेदनांनी विव्हळत राहिले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त शिक्षकाचे नराव सीताराम तिवारी असून ते राजडिहा गावातील रहिवासी आहेत.

 

दुसरी घटना: एकच पाय कटला म्हणून आली नाही रुग्णवाहिका

जामताड़ा (जमशेदपूर) च्या विद्यासागर स्टेशनवर रविवारी सकाळी 8.40 वाजता ट्रेनने उतरताना सुब्दुडीहचे मो. हबीब अन्सारी (वृद्ध) खाली पडले. रेल्वेच्या खाली येऊन त्यांना उजवा पाय कटला. त्यांना गंभीर दुखापत झाली होती, स्ट्रेचरवर तडफडत होते. परंतु पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्याऐवजी दुसरी रेल्वे येण्याची वाट पाहिली.

वृद्धाला 20 किलोमीटर दूर जामताड़ा सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी ही वाट पाहण्यात येत होती. ठीक 45 मिनिटांनंतर 9 वाजून 25 मिनिटांनी एक मालगाडी आली, त्यात स्ट्रेचरवर त्यांना ठेवून सरकारी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तेथे पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्ह्यातील 15 अॅम्ब्युलेन्सपैकी एकही त्यांच्या नशिबी नाही आली.

 

नागरिकांना आवाहन:
अशा अपघातावेळी मोबाइलमधून फोटो वा व्हिडिओ काढण्याऐवजी पीडित व्यक्तीची मदत करून चांगल्या नागरिकाचे कर्तव्य पार पाडा. अपघात कुणासोबतही होऊ शकतो. विचार करा- यांच्या जागी तुम्ही असता तर काय केले असते? 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...