आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबल ट्रॅप शुटिंगमध्ये श्रेयसीने गोल्ड तर अंकुरने पटकावले ब्राँझ, भारताच्या पदकांची संख्या 24 वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये बुधवारी शुटिंगमध्ये भारताला तीन मेडल मिळाले. सर्वात आधी शूटर ओम मिथारवलने 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य मिळवले. त्यानंतर श्रेयसी सिंहने शुटिंग डबल ट्रॅपमध्ये गोल्ड मेडल नावावर केले. तर त्यानंतर अंकुर मित्तलने डबल ट्रॅपमध्ये ब्राँझ मेडल जिंकले. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 24 झाली आहे. गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रेयसी, अंकुर आणि ओम यांच्या मेडलनंतर शुटिंगमध्ये भारताने आतापर्यंत 11 मेडल जिंकली आहेत. 


श्रेयसी - एम्मा यांच्यात झाली काट्याची टक्कर 
चौथा राऊंड संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पिक मेडलिस्ट एम्मा कॉक्स आणि श्रेयसी सिंह 96- 96 गुणांसह बरोबरीवर होत्या. त्यानंतर दोघींमध्ये शूट ऑफ झाले. त्यात श्रेयसीने 2 गुण मिळवले तर एम्माला 1 गुणच मिळवता आला. त्यामुळे ती दुसऱ्या स्थानी राहिली. ब्राँझ जिंकलेल्या लिंडा पियर्सनने 87 गुण मिळवले. श्रेयसीने यापूर्वी 2014 ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक मिळवले होते. 


अंकुर मित्तलला कांस्य 
अंकुर मित्तलनेही कांस्य पदक जिंकले. त्याने 53 पॉइंट्स मिळवले. या इव्हेंटमध्ये डेव्हीड मॅकबॅथ (74 पॉइंट्स)ला गोल्ड मिळाले. भारताचाच अशब मोहम्मद 43 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...