आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: 3 दिवस या बाबाने जनावरांसारखे माझ्या अब्रूचे तोडले लचके Daati Maharaj Case Victim Statement Recorded In Court

3 दिवस या बाबाने जनावरांसारखे माझ्या अब्रूचे तोडले लचके, पीडिता म्हणाली- बाबा खूप खतरनाक, आता जिवाला धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  दाती महाराज बलात्काराची केस दिल्ली क्राइम ब्रँचला ट्रान्सफर करण्यात आली आहे. या महाराजावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या 25 वर्षीय पीडित तरुणीने मंगळवारी कोर्टात 164 अंतर्गत जबाब दिले. तिने आपबीतीमध्ये सांगितले की, कशा प्रकारे दाती आणि त्याच्या सेवकांनी तिचे लैंगिक शोषण केले. ती म्हणाली की, आज मी त्याच्याविरुद्ध (दाती) तक्रार देत आहे. यानंतर माहिती नाही, जिवंत राहील की नाही. परंतु माझ्यासारख्या अनेक तरुणींचे आयुष्य त्यामुळे बरबाद होण्यापासून वाचेल. मी खूप दिवसांपासून घुसमटत जगत होते, परंतु आता हिंमत केली अन् पोलिस स्टेशन गाठले. 

 

3 दिवस बाबा अन् त्याचे चेले तोडत होते अब्रूचे लचके
पीडितेने जबाब दिला की, 9 फेब्रुवारी 2016 रोजी दातीची सेवेकरी महिला श्रद्धा ही मला असोला येथील शनिधाम आश्रमात चरणसेवेसाठी दाती महाराजाकडे घेऊन गेली. मला अंधाऱ्या गुहेसारख्या खोलीत पांढरे कपडे घालून पाठवण्यात आले. तेथे गेल्यावर दाती महाराज म्हणाला, मी तुझा ईश्वर आहे, इकडे-तिकडे का भटकतेस. मी सगळी वासना संपवतो. मग दाती व त्याच्या सेवेकऱ्यांनी माझ्यावर बलात्कार केला. मार्च 2016 मध्ये पाली गुरुकुलमध्येही हे सर्व पुन्हा एकदा घडले. 3 दिवस माझ्या अब्रूचे लोचके या नराधमांनी जनावरासारखे तोडले.

 

पीडितेने मागितली सुरक्षा, म्हणाली- हा बाबा खूप खतरनाक
पीडिता म्हणाली की, दाती खूप खतरनाक माणूस आहे. त्याला फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. मला आणि माझ्या घरच्यांना सुरक्षा दिली जावी, जर सुरक्षा मिळाली नाही, तर मी आणि माझे कुटुंब जिवंत राहणार नाही, हे निश्चितच! पोलिसांनी आरोपी दातीला त्याचे साथीदार श्रद्धा, अशोक, अर्जुन, निमा जोशी यांच्यावरही गुन्हा नोंदवला आहे.

 

सेवेकरी श्रद्धा म्हणायची- बाबा समुद्र तर आपण मासळ्या, कर्ज समजून फेडून टाक...
पीडिता म्हणाली की, सेवेकरी श्रद्धा तिला म्हणायची की असे केल्याने तुला मोक्ष प्राप्त होईल. हीसुद्धा सेवाच आहे. तू बाबाची आहेस आणि बाबा तुझे. तू काही नवे काम करत नाहीयेस, सगळेच करतात. काल आमची बारी होती, आज तुझी बारी आहे. बाबा समुद्र आहेत आपण मासळ्या, कर्ज समजून फेडून टाक.

 

आरोपीच्या शोधासाठी छापे नाहीत, नोटीस पाठवून बोलावूत : पोलिस
पीडितेचे कोर्टात 164 नुसार जबाब नोंदवले आहेत. आरोपीच्या शोधासाठी कुठे छापे टाकले जात नाहीयेत. त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावले जाईल. 
-देवेश श्रीवास्तव, पोलिस आयुक्त, साऊथ ईस्टर्न रेंज

 

माझ्या कुटुंबाला सुरक्षा दिली नाही तर आम्ही कोणीच जिवंत राहणार नाही...


भास्करची दाती महाराजाशी थेट बातचीत... 

Q. तुमचीच शिष्या तुमच्यावर बलात्काराचा आरोप का करत आहे?
मी तिला मुलगी मानून शिकवले आणि नंतर तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासोबत पाठवले. ईश्वर साक्ष आहे मी खरे बोलतो. हे पाण्यासारखे स्पष्ट आहे की, या पूर्ण षडयंत्रामागे त्यांचाच हाथ आहे जे मला खूप दिवसांपासून खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देत होते.

Q. पोलिसांनी तुम्हाला चौकशीसाठी बोलावले आहे का?
मी मागच्या 3 दिवसांपासून माझ्या आश्रमातच आहे. उद्या कायदेशीर सल्ल्यासाठी आश्रमातून बाहेर पडेन. मला कुणीही बोलावले नाही. मी प्रत्येक चौकशीसाठी तयार आहे.

Q. तुम्ही म्हणता की, काही जण तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकवण्याच्या धमक्या देत होते. मग तुम्ही पोलिसांत तक्रार का नाही दिली?
माझी परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे. जे काम मी केलेच नाही त्यासाठी मी का भिऊ? यामुळेच पोलिसात तक्रार दिली नव्हती.
सोमवारी पालीच्या आलावास येथील आश्रमातील सेवेकरी श्रद्धा म्हणाली की, दाती आपल्या आश्रमातच आहे आणि कोणत्याही चौकशीसाठी तयार आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...  

 

बातम्या आणखी आहेत...