आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Daati Maharaj To Undergo Potency Test In Case Of Sexual Assault, Read Question & Answers

CRIME: रेप प्रकरणात पोटेंसी टेस्टला सामोरे जाणार दाती, चौकशीत ढसा-ढसा रडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली / नवी दिल्ली - शीष्येचे लैंगिक शोषण प्रकरणाचा आरोपी दाती महाराजची क्राइम ब्रांचने शुक्रवारी दुसऱ्यांदा चौकशी केली. यावेळी दातीची चौकशी तब्बल 5 तास कसून करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवर दाती ढसा-ढसा रडला. त्याला 80 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी 30 प्रश्न असे होते जे मंगळवारच्या चौकशीत सुद्धा विचारले गेले. सह-आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, यापैकी दातीने दिलेल्या 20 प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नाहीत. त्यामुळे, आता त्याच्यावर पौरुषत्व चाचणी (पोटेंसी टेस्ट) केली जाणार आहे. 

 

उत्तरे समाधानकारक नाहीत - पोलिस
दातीला शुक्रवारी चौकशी दरम्यान मोठी पिशवी घेऊन आला होता. त्याने कथितरित्या आपल्यावरील आरोप फेटाळून लावण्यासाठी पुरावे आणले होते असे सांगितले जात आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, आतापर्यंत दातीविरोधात एकही सबळ पुरावा सापडला नाही, ज्याच्या आधारे दातीला अटक केली जाईल. दातीला विचारलेल्या प्रश्नानंतर 3 सावत्र भाऊ अर्जुन, अशोक आणि अनिल यांची उलटतपासणी सुद्धा करण्यात आली आहे. 


दातीला विचारले 80 प्रश्न त्यापैकी हे झाले Repeat
Q. ज्या दिवशी मंदिरात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे त्या दिवशी कुठे होता?
A. त्या दिवशी मंदिरात भंडारा सुरू होता. लोकांमध्ये मी व्यस्त होतो.


Q. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे? 
A. माझ्याकडे काहीच प्रॉपर्टी नाही. जेवढी आहे, तेवढी माझ्या भक्तांनी दान केली आहे. त्याचे पुरावे मी सोबत आणले आहेत.


Q. जर तुम्ही शीष्येचे शोषण केले नाही, तर ते तुमच्या सावत्र भावांनी केले आहे का?
A. मी त्या दोघांच्या विषयी काहीही बोलणार नाही. ज्या महिलेने आरोप लावले आहेत, ती माझीच शीष्या आहे आणि राहील. आश्रमात माझ्या आणखी काही शीष्या आहेत. गुरू आणि शीष्य यांचे नाते अतिशय पवित्र नाते आहे. अशा प्रकारच्या कृत्याचा मी विचार देखील करू शकत नाही.


Q. तुमच्या भाऊ आणि तुम्ही दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये काही ताळमेळ का नाही?
A. माझे सावत्र भाऊ काहीही बोलत असतील. पण, मी जे काही बोलतोय तेच सत्य आहे.


Q. यापूर्वी घटनास्थळावर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये आणि आजच्या प्रश्नोत्तरांमध्ये फरक का दिसून येत आहे?
A. ती घटना दोन वर्षांपूर्वीची आहे. कदाचित घटनास्थळाविषयी सांगताना मला काही गोष्टींचा विसर पडला असावा.


Q. तुमच्या अशा किती शीष्या आहेत, ज्यांच्याशी तुम्ही व्हॉट्सअॅपवर बोलता?
A. हे पाहा, आश्रमात जेवढ्या महिला राहतात त्या सगळ्याच माझ्या शीष्या आहेत. त्यांच्याशी मीटिंग किंवा सभेच्या दरम्यान बातचीत होत राहते. 


Q. अत्याचाराचे आरोप लावणाऱ्या शीष्येने आपल्याकडून काही पैश्यांची मागणी केली होती का?
A. रुपयांची अशा प्रकारची मागणी अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...