आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पत्नीने 4 मुलींसोबत मिळून केला फौजदार पतीचा Murder, मुलीला लावायची होती अनुकंपेवर नोकरी Daroga Murder Case: Daughters And Wife Accused In UP Latest Crime News And Updates

पत्नीने 4 मुलींसोबत मिळून केला फौजदार पतीचा Murder, मुलीला लावायची होती अनुकंपेवर नोकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर (यूपी) - शहरात 24 जून रोजी नाल्यामध्ये आढळलेल्या फौजदाराच्या मृतदेहाप्रकरणी खळबळजनक खुलासा झाला आहे. मृत फौजदाराच्या पत्नीनेच 1 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्याकांड घडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी पत्नी म्हणाली की, पती मुलींच्या पेहरावावरून त्यांच्यावर संशय घ्यायचा. मग मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागावी म्हणून त्याचा मर्डर केला. आरोपी मुली आणि पत्नीला कोर्टापुढे हजर केल्यानंतर पोलिसांनी त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. हे हत्याकांड घडवणाऱ्या सुपारी किलरला शोधण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे.  

 

पत्नीचे भावजीशी होते अवैध संबंध...
- रविवारी शहर पोलिस स्टेशनमधील फौजदार मेहरबान अली खां यांचा मृतदेह नाल्यात पडलेला आढळला होता. मृत फौजदार पोलिस लाइनमध्ये वायरलेस ऑफिसमध्ये पोस्टेड होते. कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला होता. यानंतर मृत फौजदाराच्या जावयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
- एसपी ग्रामीण सुभाष चंद्र शाक्य म्हणाले की, मृत फौजदाराच्या घरासमोर त्याच्या जावई राहतो. त्या घरावर सीसीटीव्ही लागलेला होता. पोलिसांनी फुटेज तपासल्यावर 2 तरुणांच्या संशयास्पद हालचाली त्यात दिसल्या.
- पोलिसांनी कुटुंबीयांना त्यांच्याबाबत चौकशी केली, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच पत्नी जाहिदाने सर्व कबूल केले. तिचे तिच्या भावजीशी अवैध संबंध होते, याची माहिती तिच्या फौजदार नवऱ्याला समजली होती, यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे होऊ लागली होती.

 

पत्नी म्हणाली- मुलींना कपडे घालण्यावरून करायचा शिवीगाळ
- आरोपी पत्नी म्हणाली की, तिला 4 मुली आहेत. पती त्यांना कपडे व्यवस्थित घालण्यावरून दम द्यायचा. मुलींच्या नटण्यामुरडण्यावरही त्याला आक्षेप होता.
- 'दररोज मला आणि माझ्या मुलींना घाणेरड्या शिव्या द्यायचा. शेवटी त्रस्त होऊन आम्ही त्याच्या हत्येचा कट रचला. मग मुजफ्फरनगरमध्ये राहणारे नातेवाईक कासिम आणि तहसीन यांना हत्येसाठी एक लाख रुपये देण्याचे ठरवले.'
- 'यानंतर तेही आमच्या कटात सहभागी झाले. 23 जून रोजी दोघेही घरी आले. मग ड्यूटीवरून परतलेल्या पतीचा गळा आवळून त्याला बेशुद्ध करण्यात आले. मग भिंतीवर त्याचे डोके तोपर्यंत आदळले, जोपर्यंत त्याचा मृत्यू झाला नाही.'

 

पतीची हत्या करून मुलीला लावायची होती अनुकंपेवर नोकरी
- हत्येनंतरही तब्बल 11 तास मायलेकींनी फौजदाराचा मृतदेह घरात लपवून ठेवला. त्यानंतर दोन तरुणांच्या मदतीने रात्री बाइकवरून मृतदेह  नेऊन नाल्यामध्ये फेकला.
- आरोपी पत्नी म्हणाली की, पतीची हत्या करून मुलीला त्याच्या जागी अनुकंपेवर नोकरी लावायची होती. सुपारीमध्ये दिलेली रक्कम 65 हजार रुपये तिने 5 जून रोजी पतीच्याच अकाउंटमधून काढले होते. उर्वरित पैसे काम झाल्यानंतर देण्याचे ठरले होते.

 

अफेअरमुळे झाली होती मुलीची हत्या
- दोन महिन्यांपूर्वी मृत फौजदाराच्या एका मुलीचीही हत्या झाली होती. मोठ्या मुलीचे अफेअर अरशद नावाच्या तरुणाशी होते. परंतु, यादरम्यान अर्शदला तिची छोटी बहीण झीनत पसंत आली. यामुळे ट्यूशनहून परतताना त्याने मोठ्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...