आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाती महाराजावर कायद्याची साडेसाती, 4 खुलाशांमुळे वाढू शकतात अडचणी, उद्या हाईकोर्टात सुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भास्करजवळ महिला आयोगचा अहवाल.
दाती महाराजाविरुद्ध दिल्लीमध्ये गुन्हा दाखल.


जयपूर - आपल्याच शिष्येवर बलात्काराच्या प्रकरणात आरोपी दाती महाराजाविरुद्ध तपास सीबीआयला सोपवण्याची याचिका दिल्ली हायकोर्टाने क्रिमिनल रिट पिटीशनमध्ये बदलून क्रिमिनल बेंचकडे पाठवली आहे. यावर उद्या (11 जुलै) सुनावणी होईल. दुसरीकडे, दातीविरुद्ध राजस्थानातही 3 पातळ्यांवर तपास सुरू आहे. राज्य महिला आयोगाला दातीविरुद्ध तपासात मोठी गडबड आढळली आहे. आयोगाच्या रिपोर्टमध्ये जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यांची उत्तरे देणे दातीसाठी कठीण ठरू शकते.
आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी दाती आश्रमात अनियमितता आढळून आल्यानंतर पाली कलेक्टरना पत्र लिहून निरीक्षण रिपोर्टच्या आधारे रिपोर्ट देण्यासाठी सांगितले आहे. दैनिक भास्करने जेव्हा पाली कलेक्टर सुधीर शर्मा यांना याबाबत चौकशी केली, तेव्हा ते म्हणाले- "शिक्षण विभाग, बाल कल्याण समिती आणि संबंधित विभागांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी जाऊन दातीच्या आश्रमात पडताळणी करावी. तपास अंतिम टप्प्यात आहे. आम्ही लवकरात लवकर महिला आयोगाला आमचा अहवाल पाठवू. महिला आयोगाने शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी आणि उच्चशिक्षण मंत्री किरण माहेश्वरी यांनाही पत्र पाठवून दाती आश्रमात तपास करण्यासाठी सांगितले आहे."

 

महिला आयोगाला दातीच्या आश्रमात आढळली गडबड: झाले हे 4 खुलासे

 

1. दातीच्या पालीमधील आलावास गावातील आश्वासन बाल ग्राम संस्थानमध्ये 18 जून रोजी राज्य महिला आयोगाच्या टीमने निरीक्षण केले होते. आयोगाने जी रिपोर्ट तयार केली, त्यात आढळलेल्या उणिवा क्रमाने दर्शवण्यात आल्या. सुटीच्या दिवसांत मुलींना आश्रमाच्या होस्टेलमधून घेऊन जाणारे आणि परत सोडायला येणाऱ्यांची नावे-पत्ते चुकीचे होते. आश्रमातील स्कूल आणि कॉलेजचे नियमांनुसार संचालन होत नसल्याचेही आढळले.

2. निरीक्षण रिपोर्टमध्ये उल्लेख आहे की, मुलींच्या अॅडमिशन फॉर्ममध्येच कुटुंबीय आणि पालकांचे नाव-पत्ते चुकीचे नोंदवलेले आहेत. यामुळे हेही कळत नाहीये की, या मुली कुठून आणल्या गेल्या? केव्हा आणल्या गेल्या?

3. आश्रमात ज्या दिवशी तपासणी झाली, 80 अनाथ मुली आढळल्या. यातील बहुतांश उदयपूरच्या कोटड़ा येथून आणण्यात आल्या होत्या. आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी आश्चर्य व्यक्त करत सांगितले : या मुलींचे आश्रमात कोणतेही रेकॉर्ड आढळले नाही.

4. आश्रम परिसरात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्कूल तसेच एक कॉलेज आहे. टीमला विद्यार्थिनींची संख्या 153 सांगण्यात आली, तर मोजल्यावर 253 विद्यार्थिनी आढळल्या आहेत. यात विद्यार्थिनींचे नाव-पत्ते अपूर्ण आढळले. शिक्षण आणि उच्चशिक्षण मंडळाकडून निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे दिसले. स्कूल-कॉलेजमध्ये एनरोलमेंटच्या रेकॉर्डचीही नोंद नव्हती. सरकारकडून स्कूल आणि कॉलेजेससाठी जे रजिस्टर ठरवण्यात आले आहेत, तेही आयोगाच्या टीमने मागितल्यावर आश्रमाकडे नव्हते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...