आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: दीर, सासऱ्याने सुनेचे हात-पाय बांधून रस्त्यावर केली मारहाण; दयेची भीक मागत होता चिमुकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेच्या आई वडिलांनी काढलेला फोटो... - Divya Marathi
महिलेच्या आई वडिलांनी काढलेला फोटो...

होशियारपूर - येथे एका सासऱ्याने आपल्या सुनेला भर रस्त्यावर आणून मारहाण केली. तसेच तिचे हात-पाय बांधून उन्हात फेकून दिले. सासरच्या मंडळींनी त्या महिलेच्या 7 वर्षीय मुलावर सुद्धा दया दाखवली नाही. आपल्या आईला मार खाताना पाहून तो प्रचंड घाबरला होता. रडून-रडून बेहाल झालेला चिमुरडा आपल्या आजोबांना हात जोडून भीक मागत होता की माझ्या आईला सोडा. परंतु, सासरच्या मंडळींनी त्याला सुद्धा बाहेर हकलून दिले. यानंतर शेजाऱ्यांनी फोन करून महिलेच्या पालकांना बोलावले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


काय आहे प्रकरण..?
> महिलेचे वडील सुरजीत सिंग यांनी दिलेल्याम माहितीनुसार, 7 वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह सुरजीत कौरचा विवाह बलविंदर सिंगशी झाला. त्यांना 7 वर्षांचा मुलगा देखील होता. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे व्हायची. परंतु, तिने घरच्यांना काहीच सांगितले नाही. गेल्या दीड वर्षांपासून तिचा पती परदेशात कामाला गेला आणि तेव्हापासून ती सासरवाडीपासून काही अंतरावर वेगळी राहायला लागली.
> 1 जुलै रोजी सकाळी 6 वाजता ती आपल्या सासरवाडीत काही कामानिमित्त गेली होती. त्याचवेळी दीर सुरिंदर सिंग, जाऊ कमलजीत, सासू आणि सासरे गुरमेज सिंग यांच्यात भांडण पेटले. छोट्याशा वादाने सुरू झालेल्या भांडणाने मारहाणीचे स्वरूप घेतले. त्याचवेळी दीर आणि सासऱ्याने तिचे हात-पाय बांधून घराबाहेर आणून फेकले आणि शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तिचा 7 वर्षीय मुलगा आपल्या आजी-आजोबांच्या पायांवर पडला होता आणि तो अक्षरशः दयेची भीक मागत होता. तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. 


शेजाऱ्यांनी फोन करून माहेरच्यांना बोलावले...
> मारहाण सुरू असतानाच एका शेजाऱ्याला दया आली आणि त्यांनी फोन करून महिलेच्या आई-वडिलांना फोन लावला. तसेच आपल्या मुलीला लवकरात लवकर येऊन वाचवण्याचे आवाहन केले. आई-वडील पोहोचले तेव्हा त्यांच्या मुलीचे हातपाय बांधलेले होते आणि बाजूलाच बसलेला मुलगा रडत होता. त्यांनीच आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचे फोटो काढले आणि तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले.
> जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून यासंदर्भात पोलिसांना सुद्धा घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांना तिच्या वडिलांनी संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...