आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त डिओड्रंट लावल्यामुळे झाला तरुणाचा मृत्यू, जाणून घ्या कसे घडले हे सगळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्याचा परफ्युम लावल्यामुळे मृत्यू होऊ शकतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का? जर नाही तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, काही वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये अशाच एका विचित्र मृत्यूचा प्रकार समोर आला होता. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 16 वर्षांच्या थॉमस टाउनसेंडचा जास्त डिओड्रंट लाल्याने मृत्यू झाला होता. 


आईने सांगितल्या या गोष्टी..
इंग्लंडच्या फोकस्टोनमध्ये राहणाऱ्या थॉमसच्या मृत्यूनंतर पोलिसांना त्याच्या खोलीतून 40 हून अदिक डिओड्रंटच्या बॉटल आढळल्या होत्या. थॉमसच्या आईने सांगितले की, त्याला अंघोळ करायला आवडत नव्हते. तो अनेक आठवडे अंघोळ न करता राहत होता. त्यामुळे तो परफ्युमच्या  अनेक कॅन रिकाम्या करत होता. थॉमसच्या आईने सांगितले की, त्यांना माहिती होते की थॉमसला परफ्युम आवडतात. पण तो परफ्युमसाठी एवढा वेडा असेल असे वाटले नव्हते असे त्या म्हणाल्या. 


पोस्मॉर्टममध्ये समोर आल्या या बाबी.. 
पोलिसांच्या मते, थॉमसचा मृतदेह पालथा पडलेला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले की, थॉमसचा मृत्यू श्वास थांबल्यामुळे झाला होता. श्वास गुदमरण्याचे कारण शरिरात अधिक प्रमाणात ब्युटेन गॅस का. हा गॅस बहुतांश डिओड्रंटमध्ये वापरला जातो. त्याशिवाय त्याच्या शरिरात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल किंवा ड्रग्स आढळून आले नाही. त्यामुळे थॉमसचा मृत्यू डिओड्रंटमुळेच झाला होता, हे स्पष्ट झाले. 

रिपोर्ट्सनुसार मुताबिक थॉमसने एकाच वेळी अर्ध्यापेक्षा अधिक डिओड्रंटच्या बॉटलचा वापर केला होता. त्यामुळे त्यातून सलग बाहेर येणारा ब्युटन गॅस त्याच्या फुफ्फुसांमध्ये राहून जातो आणि मग त्याला श्वासोच्छ्वास घेता येत नाही. 


2017 मध्येही घडली होती अशी घटना 
अशीच आणखी एक घटना इंग्लंडच्या फ्लीटवूडची आहे. त्याठिकाणी 12 वर्षांची पेज डॉटरी जास्त डिओड्रंट वापरल्यामुळे मारली गेली होती. पेज तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती. 

 


पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच काही मृत्यूशी संबंधित Facts..

बातम्या आणखी आहेत...