आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रांतीला बहिणीकडे तिळगूळ घेऊन जात होता भाऊ, तेवढ्यात कळली तिच्या मृत्यूची बातमी..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहिणीच्या मृतदेहाजवळ आक्रोश करताना भाऊ. इनसेट बहिणीचा मृतदेह. - Divya Marathi
बहिणीच्या मृतदेहाजवळ आक्रोश करताना भाऊ. इनसेट बहिणीचा मृतदेह.

मुझफ्फरपूर - येथील पोलिस लाइन बरॅकमध्ये शनिवारी संशयास्पद परिस्थितीत लेडी कॉन्स्टेबल चंदा राणी यांचा मृतदेह खिड़कीला ओढणीच्या फासाला लटकलेला आढळला. मृत महिलेचा भाऊ मकर संक्रांतीसाठी माहेरातून तिळगूळ घेऊन जाणार होता. पण आधीच अनर्थ झाला अन् बहिणीच्या मृत्यूची बातमी समजली. मृत चंदा आपल्या दोन्ही लहान भावांच्या शिक्षणाचा खर्च उचलत होती. दुसरीकडे, लेडी शिपायाच्या मृत्यूनंतर भाऊ म्हणाला की, आत्महत्येसाठी प्रेरित करणे ही हत्याच आहे. 


वडील पाटण्यात करतात खासगी नोकरी...
- नालंदाच्या रतनपूरची रहिवासी चंदा रानी यांचे वडील पाटण्यात खासगी नोकरी करतात. दोन लहान भावांची ती एकुलती एक बहीण होती. दोन्ही भावांच्या शिक्षणाचा खर्चही ती उचलत होती. 
- महिला पोलिसांत नियुक्तीनंतर तिने दोन्ही भावांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. तिने अजून लग्नही केले नव्हते.
- चंदा राणीच्या भावाला ओळखणाऱ्या एक महिला शिपायाच्या मोबाइलवर सातत्याने मृत चंदाच्या भावाचे कॉल येत होते.
- मृत चंदाच्या भावाशी बोलण्याची महिला शिपायाची हिंमत होत नव्हती. 15 जानेवारीला मकर संक्रांतीला घरातून तिळगूळ घेऊन भाऊ जाणार होता. तेवढ्यात हा अनर्थ घडला.

 

फरशीला पायांचा होत होता स्पर्श...
- 12 वाजता जेव्हा मुन्नी कुमारी या शिपाई महिला बराकीत पोहोचल्या तेव्हा आतून खोली बंद होती. मुन्नीने हाका मारल्यानंतर इतर महिला शिपाईही तेथे पोहोचल्या.
- दरवाजा न उघडल्याने डीएसपीच्या कार्यालयातील शिपायांना आवाज देण्यात आला. दार तोडून पाहिल्यावर चंदा खिडकीला लटकत असलेली दिसली. परंतु, तिचे पाय फरशीला स्पर्श करत होते.
- मॅजिस्ट्रेट यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. एफएसएल टीमनेही पाहणी केली. पोलिसांनी प्राथमिक तपासात आत्महत्येचे प्रकरण सांगून इतर बाबींवरही चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

 

सोबती महिला शिपायाने सांगितले असे काही...
- मृत्यूच्या काही वेळापूर्वीच चंदाने सांगितले होते की- अमृता तू ड्यूटीवर निघ.  खाली चल म्हटल्यावर चंदा म्हणाली- मी नंतर येईन.  
- कळलेच नाही, काही वेळात असे काय झाले की तिच्यासोबत एवढा अनर्थ घडला? सोबती शिपाई महिला अमृता असे म्हणून ढसाढसा रडायला लागली.
- इतर महिला शिपाईही अश्रू ढाळत होत्या. सर्व एकच म्हणत होत्या- चंदा खूप आनंदी आणि मिनमिळाऊ स्वभावाची होती.
- मग कोणत्या कारणाने तिला असे करायला मजबूर केले. बराकीत उष्टी अन्नाचे ताट दाखवून सोबती शिपाई म्हणाल्या- असे कोणी आत्महत्या करू शकते का? 
- जे झाले ते फार वाईट झाले. 21 नोव्हेंबरला ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर इतर महिला शिपायांसह ती परेडमध्ये सामील झाली होती.
- सकाळी साडे 10 वाजेपर्यंत खूप नॉर्मल होती. सर्वांना एकच प्रश्न पडला होता- हे घडलेच कसे?

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...