आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जवानाची पत्नी फोनवर म्हणाली सासरचे खूप मारहाण करताहेत; माहेरच्यांनी घेतली धाव समोर होता मुलीचा मृतदेह Death Of Soldier Wife

जवानाची पत्नी फोनवर म्हणाली- सासरचे खूप मारहाण करताहेत; माहेरच्यांनी घेतली धाव - समोर होता मुलीचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरदासपूर (पंजाब) - पंजाब सरकार व समाजसेवी संस्था लग्नातून हुंडाप्रथेच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करत आहे. परंतु अजूनही समाज या कुप्रथेतून बाहेर यायला तयार नाही. याचे ताजे उदाहरण गुरदासपूरमध्ये पाहायला मिळाले, येथे 8 महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेली सून जी या वेळी गर्भवती होती, तिची हत्या करण्यात आली. मृत विवाहितेच्या गळ्यावर हाताने आवळल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मृत विवाहितेचा पती सैन्यात आहे.

- पोलिसांनी सासरच्या 4 जणांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रेरित केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.
- गावाचे सरपंच हरप्रीत सिंह म्हणाले, त्यांचे चुलते हरजित सिंह यांची मुलगी मनजीत कौर (20) हिचे लग्न 22 ऑक्टोबर 2017 रोजी सिमरन सिंहशी झाले होते.
- लग्नाच्या वेळी मनजितचे वडील हरजित सिंह यांनी आपल्या कुवतीप्रमाणे हुंडा दिला होता, परंतु लग्नानंतरच मनजीतला आणखी हुंडा आणण्यासाठी त्रास द्यायला सुरुवात झाली. सासरी नेहमी तिला मारहाण केली जात होती.

 

अनेक वेळा घातली होती समजूत
-हरप्रीत म्हणाले, मनजित कौरच्या लग्नानंतर अनेक वेळा लोकांनी मध्यस्थी करून तिच्या सासरी जाऊन समजूत घातली होती. परंतु सासरचे हुंड्याचे लोभी होते, त्यांनी त्रास देणे सुरूच ठेवले.
- मनजीत कौरचा पती सिमरन सिंह सैन्यात आहे. सध्या तो फिरोजपुरात तैनात आहे. सिमरन दोन दिवसांपूर्वीच घरी आला होता आणि आज सकाळीच मनजीत कौरशी भांडणानंतर परत गेला होता.

 

मंगळवारी मनजीतने दोन वेळा केला फोन
हरजित सिंह म्हणाले, मंगळवारी मुलीने आधी 12 वाजता आणि मग पावणे 4 वाजता फोन करून म्हटले की, सासरचे तिला प्रचंड मारझोड करत आहेत आणि तिला ते जिवेच मारतील. काही वेळानंतर तिचा सासरा इकबाल सिंहचा फोन आला की, तुम्ही तुमची मुलगी घेऊन जा. हे ऐकून आम्ही सर्व धावतच मुलीच्या सासरी पोहोचलो. घराच्या लॉबीमध्ये मनजीतचा मृतदेह पडलेला होता आणि गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या. सासरचे सर्व मात्र फरार होते.

 

पती, सासरा, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिस अधिकारी जबरजीत सिंह म्हणाले की, माहेरच्या मंडळींच्या तक्रारीवरून मृत मनजीत कौरचा पती सिमरन सिंह, सासरा इकबाल सिंह, सासू गुरमीत कौर व नणंद कुलविंदर कौर ऊर्फ रूबीविरुद्ध 304बी (आत्महत्येसाठी प्रेरित करणे) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...