आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदाराचे बलात्कार प्रकरण; पित्याचा संशयास्पद मृत्यू, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्नाव - उत्तर प्रदेशातील भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या पित्याचा तुरुंगात संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबीयांनी आमदारानेच त्यांचा खून केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात माखी पोलिस ठाण्याचे एसओ व चार हवालदारास निलंबित करण्यात आले आहे. पीडित महिलेने रविवारी पोलिसांनी बलात्कार प्रकरणात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांच्या निवासस्थानाबाहेर तिने आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला.


कुलदीप सिंह सेनगर हे उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. पण आमदाराच्या दबावामुळे गेल्या एक वर्षापासून एफआयआर दाखल केलेला नाही, असा महिलेचा आरोप होता. ३ एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने वडिलांना मारहाण केली. उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वडिलांना अटक केली. 


अखिलेश यादव यांची योगी सरकावर टीका : अखिलेश यादव यांनी टि्वटरवर म्हटले, राज्यात कोठे कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थिनीवर भररस्त्यात गोळ्या घातल्या जात आहेत. तर भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप होतो आहे. करण्याचा प्रयत्न केला. चकमक फेम सरकारची हीच दहशत आहे का?

 

मृताची उलट्या व दुखत असल्याची तक्रार
उन्नाव जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अतुल यांनी सांगितले, पीडित महिलेच्या पित्याला उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर रविवारी रुग्णालयात आणले होते.  सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...