आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आसाराम केसमध्ये निकाल उद्या: जोधपूरमध्ये आसाराम भक्तांना \'नो एंट्री\' Decision In Asaram Case To Be Pronounced Inside Jodhpur Central Jail

आसाराम केसमध्ये निकाल उद्या: जोधपूरमध्ये आसाराम भक्तांना \'नो एंट्री\', दर 4 तासांनी हॉटेल्सची तपासणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये बुधवारी आसारामसोबतच त्याच्या 4 साधकांवरही निकाल सुनावण्यात येईल. - Divya Marathi
जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये बुधवारी आसारामसोबतच त्याच्या 4 साधकांवरही निकाल सुनावण्यात येईल.
- इंदिरा गांधींचे मारेकरी, दहशतवादी कसाब आणि राम-रहीमलाही तुरुंगातच सुनावण्यात आला होता निर्णय. तुरुंगात निकालाचे हे चौथे प्रकरण.
- जोधपूरच्या ज्या तुरुंगात निकाल सुनावण्यात येईल. तेथे 31 वर्षांपूर्वी अकाली नेता गुरचरणसिंह टोहरा विटनेस बॉक्समध्ये उभे होते.

जोधपूर - देशातील सर्वाधिक चर्चित लैंगिक शोषण प्रकरणांपैकी एक असलेल्या आसाराम केसमध्ये बुधवारी जोधपूर जेलमध्ये कोर्ट आपला निकाल सुनावणार आहे. सुरक्षा पाहून या दिवशी शहरात आसाराम समर्थकांसाठी ‘नो एंट्री’ असेल. शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर गुप्तचर संस्था साध्या वेशात नजर ठेवून आहे. सर्व पोलिस स्टेशन्सच्या पथकांनी सोमवारी होटल्सची दर 4 तासांनी तपासणी करून यात थांबलेल्या लोकांची चौकशी केली. तुरुंगाचा एक हॉल कोर्ट रूमसाठी तयार करण्यात आला आहे. 

 

जोधपूरमध्ये हायअलर्ट : चहुकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष

- आसाराम समर्थकांची जोधपूरला पोहोण्याची शक्यता पाहून शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनसोबतच बासनी, भगत की कोठी आणि राइका बाग स्टेशनवर गुप्तचर संस्था साध्या वेशात नजर ठेवून आहे. यासोबतच मंगळवारी सकाळपासूनच शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर पोलिसांची नाकेबंदी सुरू होऊ शकते. 
- शहरात मंगळवार आणि बुधवारी तब्बल दीड हजारांहून जास्त पोलिस जवान आणि अधिकारी कोपऱ्यानकोपऱ्यावर तैनात राहतील. यासोबतच 5 आरएसीची अतिरिक्त तुकडी, एसटीएफ, हाडी रानी बटालियन, वज्र, वाटर कॅननही तैनात करण्यात आली आहे.

- दुसरीकडे, पोलिसांनी शहरवासीयांनीही लपूनछपून शहरात राहत असलेल्या आसाराम समर्थकांची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये वा पोलिस कंट्रोल रूममध्ये देण्याची अपील केली आहे.

 

शस्त्रधारी जवान पहारा देणार
- जोधपूर जेल येथील एकमेव जेल होती जेथे शस्त्रधारी आरएसी जवान पहारा द्यायचे. तुरुंगाचे डीआयजी विक्रम सिंह म्हणाले की, जेलच्या आत त्यांना शस्त्रास्त्रे बाळगण्याची परवानगी नाही. आधी दहशतवाद्यांची ट्रायल व आसारामचा निकाल पाहता पुन्हा शस्त्रधारी जवान पहारा देतील.

 

महिला समर्थकांना आवरण्यासाठी विशेष बंदोबस्त
- त्यांना घेऊन जाण्याचे ठिकाण चिन्हित, बसेसही तयार आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून शहरात येत असलेल्या आसाराम समर्थकांमध्ये महिलांची संख्याही खूप मोठी आहे.
- शहरात निकालाच्या दिवशी आसारामच्या महिला समर्थकांची येण्याची शक्यता पाहून पोलिसांनी विशेष बंदोबस्त केले आहेत. याअंतर्गत सेंट्रल जेल आणि याच्या आसपासच्या क्षेत्रात पर्याप्त महिला जवानांचा बंदोबस्त केला जात आहे.
- याशिवाय रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि रोडवेज बस स्थानकावरही महिला जवानांना तैनात केले जात आहे. ज्या कोणत्याही महिला समर्थकाला पाहताच पकडण्यासाठी तयार राहतील. आवश्यकता भासल्यास या स्थानाच्या बाहेर रोडवेजच्या बसेसही तयार राहतील. ज्यात आसाराम समर्थकांना पकडून ठरलेल्या जागेवर नेले जाईल. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...