आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही शूरपुत्राच्या माता, शहीद औरंगजेबच्या आईला भेटून भावूक झाल्या निर्मला सीतारमण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवान औरंगजेबच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर बुधवारी पुंढ येथील रायफलमॅन औरंगजेबच्या घरी पोहोचल्या. शहीदमातेला दिलासा देताना त्या स्वतः भावूक झाल्या.

 

सीतारमण म्हणाल्या की, तुम्ही शूरपुत्राच्या माता आहात. त्याने देशाची मान उंचावली आहे. आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत आणि शक्य ती सर्व मदत तुम्हाला मिळेल. 19 जूनला लष्करप्रमुख बिपिन रावतही औरंगजेब यांच्या कुटुंबाला भेटायला पोहोचले होते. रायफलमन औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी ईदच्या दोन दिवसांपूर्वी 15 जूनला पुलवामामधून अपहरण केले होते. 


शादीमर्गमध्ये तैनात होते 
4 जम्मू-काश्मीर लाइट इन्फेंट्रीचे जवान असलेले औरंगजेब 44 राष्ट्रीय रायफलबरोबर शोपियाँमधील शादीमर्गमध्ये तैनात होते. ते ईद साजरी करण्यासाठी सकाळी 9 वाजता घरातून निघाले होते. शादीमर्ग कँपच्या बाहेर सहकाऱ्यांनी त्यांना एका प्रायव्हेट कारमध्ये बसवले. काही अंतरावर गेल्यानंतर चार-पांच दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान गोळ्यांनी चाळणी झालेला त्यांचा मृतदेह आढळला होता. औरंगजेब मेजर शुक्ला यांच्याबरोबर तैनात होते. मेजर शुक्ला यांनी गेल्या महिन्यात दहशतवादी समीर टायगरला चकमकीत ठार केले होते. 

बातम्या आणखी आहेत...