आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमची राजदार विपासना इन्सांविरुद्ध अटक वॉरंट जारी, सिरसा डेऱ्यातून झाली फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेरा सच्चा सौदामध्ये रविवारी पोलिसांनी छापा टाकला, परंतु तेथे विपासना आढळली नाही. - फाइल. - Divya Marathi
डेरा सच्चा सौदामध्ये रविवारी पोलिसांनी छापा टाकला, परंतु तेथे विपासना आढळली नाही. - फाइल.

सिरसा - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राहिलेल्या बलात्कारी गुरमित राम रहीम इन्साची सर्वात मोठी राजदार विपासना इन्साविरुद्ध पोलिसांनी अटक वॉरंट जारी केले आहे. परंतु, ती सिरसा डेऱ्यातून फरार झालेली आहे. गत काही दिवसांत डेऱ्यामध्ये पंचकुला एसआयटीने अनेक वेळा छापेमारी केली, परंतु विपासना इन्सां तेथे आढळली नाही. विपासनाविरुद्ध समन्सही जारी करण्यात आले होते, परंतु हजर झाली नाही.


भक्तांना नपुंसक बनवणाऱ्या आरोपी डॉक्टरला अटक
- पंचकुला एसआयटीने इनपुटच्या आधारे गत रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता सिरसा डेऱ्यात धाड टाकली होती.
- तपासणीदरम्यान डॉक्टर महिंदर इन्साला अटक करण्यात आली. तो एका कमऱ्यात लपलेला होता. त्याच्यावर बाबाच्या भक्तांना नपुंसक बनवण्याचा आणि देशद्रोहाचा आरोप आहे. यादरम्यान विपासना इन्सां तेथे आढळली नाही.
- एसीपी मुकेश मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने महिंदर इन्सा यांना पंचकुला कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना तीन दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे.

 

आदित्य इन्साच्या संपर्कात होता डॉ. महिंदर
- सूत्रांनुसार, महिंदर आदित्य इन्सां यांच्या संपर्कात होता. असे म्हटले जात आहे की, त्याला आदित्यचा नवा मोबाइल नंबर माहिती आहे.
- पंचकुला हिंसेच्या चौकशीदरम्यान डॉ. महिंदर इंसांचे नाव समोर आले होते. तेव्हापासून तो फरार होता.

 

दंगलीसाठी झालेल्या मीटिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप
- सूत्रांनुसार, पंचकूला हिंसेच्या आधी 17 ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदामध्ये एक मीटिंग झाली होती. यात दंगलीचा कट रचण्यात आला होता. आरोप आहे की, या बैठकीत हनीप्रीत आणि विपासनाही हजर होते. चौकशीदरम्यान हनीप्रीतनेही विपासनावर हा आरोप केलेला आहे.

 

आधी बोलावल्यावर नाही आली विपासना इंसां
- याआधी ऑक्टोबर 2017 मध्ये एसआयटीने विपासनाला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु तेव्हा ती अनेक वेळा तब्येत ठीक नसल्याचा हवाला देऊन चौकशी टाळत राहिली.
- यानंतर जेव्हा ती चौकशीला तयार झाली तेव्हा पोलिसांनी विपासना आणि हनीप्रीतला आमने-सामने बसवून चौकशी केली होती.

 

कोण आहे विपासना इन्सा?
- 35 वर्षीय विपासना इंसां डेरा सच्चा सौदा आश्रमाची एक साध्वी आणि डेऱ्याची मॅनेजमेंट मेंबर आहे.
- तिला गुरू ब्रह्मचारी विपासना या नावानेही ओळखले जाते. ती राम रहीमनंतर डेऱ्यात दुसऱ्या नंबरवर आहे. राम रहीमकडून सर्व निर्णय घेण्यासाठी विपासनाच ऑथोराइज पर्सन होती.
- ती मागच्या 7 वर्षांपासून डेरा प्रमुखाच्या सर्वात जवळच्या लोकांपैकी एक आहे. 
- 25 तारखेला पंचकूलामध्ये झालेल्या हिंसेनंतर विपासनाने ट्विटरच्या माध्यमातून लोकांना हिंसा रोखण्यासाठी आवाहन केले होते.

 

काय झाले होते पंचकूला दंगलीत?
- दोन साध्वींवरील बलात्काराच्या खटल्यात 25 ऑगस्टला राम रहीमला सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने दोषी ठरवले होते. यानंतर डेरा सच्चा सौदाच्या अनुयायायांनी हरियाणा आणि पंजाबसहित अनेक राज्यांत दंगल- जाळपोळ केली होती.
- पंचकुलामध्ये अनुयायांनी वाहने जाळली, पेट्रोल पंप जाळला, सरकारी आणि खासगी कार्यालयांना आग लावली. सिरसामध्येही हेच हाल होते. हिंसेत 41 जणांचा मृत्यू झाला, यातील 36 जणांचा जीव केवळ पंचकूलामध्येच गेला होता.

 

रेप केसमध्ये राम रहीमला किती शिक्षा, कोर्टाने काय म्हटले होते?
- 28 ऑगस्टला डेरा सच्चा सौदा चीफ राम रहीमला दोन साध्वींवरील बलात्काराप्रकरणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
- आपल्या 9 पानी निकालात जज म्हणाले, "ज्याने आपल्या साध्वींनाही सोडले नाही, एखाद्या हिंस्र श्वापदासारखा वागला, तो दयेला पात्र असूच शकत नाही."


पुढच्या स्लाइड्सर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज.... 

बातम्या आणखी आहेत...