आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून पळून गेले दीर-भावजयी, दुसऱ्या दिवशी झाडाला एकाच ओढणीने घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर - एका दिवसापूर्वीच घरातून पळून गेलेल्या दीर आणि भावजयीने झाडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच धोरीमन्ना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडावरून दोघांचे मृतदेह उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि नंतर कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. 

 

पोलिसांना संशय आहे की, दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली. कमला देवी आणि देवाराम अशी मृतांची नावे आहेत. 

 

प्रेमसंबंधांमुळे आत्महत्या
पोलिसांच्या मते, दोघांमध्ये दीर्घकाळापासून प्रेमसंबंध सुरू होते. दीर देवाराम अविवाहित होता तर मृत कमलाला 2 मुले आहेत. त्यात एक 5 वर्षांचा, तर दुसरा 2 वर्षांचा आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजता दोघेही घरातून पळून गेले होते. शुक्रवारी सकाळी 5 वाजता घरापासून 30 किमी अंतरावर दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. कमला अशिक्षित होती, तर देवाराम सुशिक्षित होता.


बाड़मेरः 3 महिन्यांत आत्महत्येच्या 5 घटना, 11 जणांचा मृत्यू
> चौहटन परिसरात टॅक्सी चालकासोबत एका तरुणीने आत्महत्या केली. सुसाइड नोट आढळली होती. 
> बिजराड़ परिसरात एका किशोरवयीन मुलासोबत दोन चुलत बहिणींनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.
> सिणधरी परिसरात नणंदोई आणि मेहुणीदरम्यान प्रेम-प्रसंगामुळे नाराज सासूने भांडण केले म्हणून दोघांनी आत्महत्या केली.
> चौहटन परिसरात किशोरवयीन मुलीने वाग्दत्त वर पसंत आला नाही म्हणून प्रियकरासोबत आत्महत्या केली.
> धोरीमन्नामध्येही दीर-भावजयीन झाडाला गळफास घेऊन सुसाइड केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...