आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dilip Vengsarkar Revealed Backing Of Virat Kohli Led To My Removal As Chief Selector

विराटला संघात घेऊ इच्छित नव्हते श्रीनिवासन, धोनी; संधी दिली तर मला हटवले : वेंगसरकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप वेंगसरकर 2006 ते 2008 दरम्यान टीम इंडियाचे चिफ सिलेक्टर होते. (फाइल) - Divya Marathi
दिलीप वेंगसरकर 2006 ते 2008 दरम्यान टीम इंडियाचे चिफ सिलेक्टर होते. (फाइल)

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय टीमचे माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी गुरुवारी अध्यक्षपदावरून गच्छंती होण्याबाबत एक मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, 2008 मध्ये विराट कोहलीला श्रीलंका दौऱ्यासाठी टीममध्ये सहभागी केल्याने तत्कालीन ट्रेजरर एन श्रीनिवासन यांच्याबरोबर त्यांचे मतभेद झाले होते. त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये एस बद्रीनाथला ठेवायचे होते. पण मी विराट कोहलीसाठी भांडत होतो. धोनी आणि कर्स्टनही श्रीनिवासन यांच्या पाठीशी होते. नंतर दुसऱ्याच दिवशी ते तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि माझी पदावरून गच्छंती झाली. 


नेमके काय घडले.. 
- मुंबईत एका कार्यक्रमात वेंगसरकर म्हणाले, ऑस्ट्रेलियामध्ये इमर्जिंग प्लेयर्स टुर्नामेंट असते. त्यात भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम सहभागी होतात. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की, अंडर-23 प्लेयर्सना तेथे घेऊन जायचे. तेव्हा विराट अंडर-19 चा कर्णधार होता. मी त्याला त्या स्पर्धेसाठी टीममध्ये घेतले. 
- विराट तेव्हा ओपनर होता. एका मॅचमध्ये त्याने नाबाद 123 धावा केल्या. मला वाटले याला भारतीय संघात स्थान द्यायला हवे. तो चांगला खेळाडू आहे असे वाटले. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यासाठी टीम निवडली जात होती. मला ही संधी योग्य वाटली आणि मी विराटला संधी दिली. 


कोहलीच्या फेव्हरमध्ये का नव्हते कस्टर्न आणि धोनी?
वेंगसरकर यांच्या मते, सिलेक्शन कमिटीचे इतर सदस्य माझ्या मताशी सहमत होते. पण गॅरी कर्स्टन आणि धोनीचे म्हणणे होते की, असे करायला नको. त्यांचे म्हणणे होते की, त्यांनी विराटचा खेळ पाहिलेला नाही. पण मी त्यांना सांगितले की, तुम्ही पाहिले नसले तरी, मी कोहलीचा खेळ पाहिला आहे. 


श्रीनिवासन का झाले नाराज.. 
- वेंगसरकर म्हणाले की, त्यावेळी काही लोकांना दक्षिणेतील बद्रीनाथला संघात घ्यावे असे वाटत होते, तो चेन्नई सुपरकिंग्समध्ये होता. पण मी विराटला संधी दिली. त्यामुळे बद्रीनाथ स्पर्धेतून बाहेर गेला. बीसीसीआयचे ट्रेझरर एन श्रीनिवासन नाराज झाले. त्यांनी विचारले की, तुम्ही बद्रीनाथला बाहेर कसे केले. त्यावर मी सांगितले की, असामान्य क्रिकेटवटू आहे त्यामुळे त्याला संधी मिळायला हवी. 
- वेंगसरकर पुढे म्हणाले, श्रीनिवासन यांचा तर्क होता की, बद्रीनाथने तमिळनाडूसाठी एक सिझनमध्ये 800 धावा केल्या, तरीही त्याला बाहेर का ठेवले जात आहे? तो 29 वर्षांचा झाला आहे, त्याला संधी कधी देणार. मी म्हणालो, त्याला लवकरच संधी मिळेल, पण केव्हा मिळेल हे सांगता येणार नाही. 
- वेंगसरकर म्हणाले की, श्रीनिवासन दुसऱ्याच दिवशी के. श्रीकांत यांच्यासह शरद पवारकडे गेले आणि माझी पदावरून सुटी झाली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...