आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीतील कैराना लोकसभा पोटनिवडणूकीत हिंदू-मुस्लिम मतांची विभागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैराना -  २८ मे रोजी उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. दोन कारणांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पहिले कारण - २०१३ मध्ये येथे जाट व मुस्लिम दंगल झाली होती.


या दंगलीनंतर येथील राजकीय चित्र कसे ठरते, हे या पोटनिवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. दुसरे कारण गोरखपूर     व फुलपूर मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजप पराभूत झालेला आहे. यामुळे या निवडणुकीस विशेष महत्त्व आले आहे. २०१९ च्या तयारीच्या दृष्टीनेही या निवडणुकीस नेट-प्रॅक्टिस मानले जात आहे. भाजपचे खासदार हुकूमसिंग यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. आता येथे कैरानातील हुकूमसिंग व अख्तर हसन या दोन कुटुंबांत मुख्य लढत होत आहे. हुकूमसिंग यांच्या वतीने मृगांका सिंह भाजपच्या उमेदवार आहेत. तर दिवंगत खासदार मुनव्वर हसन यांची पत्नी तबस्सुम हसन राष्ट्रीय लोकदलाच्या  चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्या सपा-बसप-काँग्रेस आघाडीच्या संयुक्त उमेदवार आहेत. 


अकैराना येथे दोन्ही उमेदवारांकडे ८-८ लाख मतांचे समीकरण आहे. परंतु विरोधकांनी जाट समाजात प्रभावी असलेल्या राष्ट्रीय लाेकदल पक्षाच्या चिन्हावर संयुक्त उमेदवार उभा करून भाजपला आव्हान दिले आहे. विरोधी पक्ष गोरखपूर व फुलपूर पोटनिवडणुकीप्रमाणे भाजपला धडा शिकवतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.   

 

भाजपचा जोर मुस्लिम मतांच्या विभागणीवर, कंवर काँग्रेसचे गेमचेंजर  

भाजपची रणनीती मुस्लिम मतांचे विभाजन करण्याची आहे. पक्षाने इम्रान मसूदच्या तबस्सुम यांच्या कुटुंबीयांशी असलेल्या वैराचा फायदा घेण्याचे ठरवले आहे. मसूद यांनी तबस्सुम हसनचा दीर कंवर हसन यांना मुस्लिमांची मते फोडण्यासाठी निवडणूक मैदानात उतरवले होते. आता विरोधी पक्षांनी कंवर हसन यांना आपल्या बाजूने वळवले आहे. कंवर हसन यांनी तबस्सुम हसन यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.  

 

५ पैकी ४ आमदार भाजपचे, तरीही दोन लाख मतांची होते पिछाडी  

कैराना लोकसभा मतदासंघात कैराना, शामली, थानाभवन, नकुड व गंगोह असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी ४ आमदार भाजपकडे आहेत. तर  तबस्सुम हसन यांचा मुलगा नाहिद हसन (सपा) कैराना मतदारसंघाचे आमदार आहेत. समीकरणाच्या दृष्टीने पाहता २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत भाजपला ५०.५४% मते मिळाली होती. तर सध्याच्या आघाडीचे मतदान पाहता भाजप पिछाडीवर आहे.  

 

हिंदू मतांमध्ये सामाजिक समीकरण साधण्याची भाजपची रणनीती  

भाजपने हिंदू मतांचे सामाजिक समीकरण साधण्यासाठी रणनीती आखली आहे. १३ जाट अामदार, ५ गुर्जर आमदार, सैनी व कश्यप नेता, दलितांमध्ये खासदार कांता कदम, अशोक प्रधान व पाल येथे मंत्री एस. पी. बघेल यांच्यासह सर्व समाजातील २०० नेत्यांची फौज मायक्रो लेव्हलपर्यंत उतरवण्यात आली आहे. तसेच हुकूमसिंग यांचा पुतण्या अनिल चौहान यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. तत्पूर्वी त्यांनी भाजप सोडला होता. 

 

 पुढील स्लाईडवर पहा २०१७ विधानसभा निवडणुकीच्या आधारे मतांचे गणित  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...